मुंबई 23 ऑगस्ट**:** बिग बॉस (Bigg Boss OTT) हा लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शोमधून ओळखला जातो. या शोचं नवं पर्व वूट या OTT प्लॅटफॉर्मवर सध्या सुरू आहे. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कलाकारांची स्पर्धा पाहायला मिळत आहे. मात्र बिग बॉसमध्ये आणखी ड्रामा वाढवण्यासाठी आता राखी सावंतची (Rakhi Sawant) एण्ट्री होणार आहे. परंतु ती स्पर्धक म्हणून नव्हे तर घरातील कलाकारांना घाबरवण्यासाठी एक भूत म्हणून येणार आहे. वूटने अलिकडेच बिग बॉसचा नवा प्रोमो रिलिज केला होता. यामध्ये राखी सावंत घरातील सर्व सदस्यांना भूत बनून घाबरवताना दिसत आहे. तिने जणू एकाच्या चेटकीणीसारखा मेकअप केला आहे. तिच्या या कॅरेक्टरला जूली असं नाव देण्यात आलं आले. लवकरच मी बिग बॉसमध्ये परतणार आहे असं आश्वासन तिने या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना दिलं. HBD: एक चापट आली अंगाशी; ‘त्या’ पब्लिसिटी स्टंटमुळे संपलं गौहरचं करिअर
राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. 1997 साली ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला.