मुंबई 23 ऑगस्ट: बिग बॉसमधून (Bigg Boss) नावारुपास आलेली गौहर खान (Gauhar Khan) ही कधीकाळी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. आज गौहरचा वाढदिवस आहे. 37 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Happy B'day Gauahar Khan) गेली दोन दशकं ती मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. मालिकांसोबतच तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं होतं. परंतु एका लाईव्ह शोमध्ये मारलेल्या त्या चपराखेमुळे तिच्या करिअरला उतरती कळा लागली. पाहूया काय होता तो किस्सा...
काही वर्षांपूर्वी एका फॅशन शोमध्ये गौहरला प्रमुख पाहुणी म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी स्टेजवर रँमवॉक करताना एका व्यक्तीने अडवलं अन् शिव्या घालत तिच्या थोबाडीत मारली. हा प्रकार पाहून सर्वजण चकित झाले. त्यानंतर गौहरनं एकच गोंधळ घातला. तेथील उपस्थित गार्ड्सने त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकारामुळे गौहर रातोरात प्रसिद्ध झाली. परंतु हा प्रकार केवळ पब्लिसिटी स्टंटसाठी करण्यात आला होता असं पुढे सिद्ध झालं.
करीनाचा मुलगा पहिल्यांदा आला कॅमेरासमोर; जहाँगीरचा फोटो व्हायरल
थोबाडीत मारलेल्या व्यक्तीनं गौहरविरोधात आरोप केले. तिनेच त्याला मारण्यासाठी पैसे दिले होते. शिवाय त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं देखील जाईल आश्वासन मिळालं होतं. परंतु या प्रकरणानंतर गौहरनं असं काही केलं नाही. परिणामी संतापलेल्या त्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत गौरहविरोधात आरोप केले. परिणामी प्रकरणामुळे तिच्यावर जोरदार टीका झाली. अन् रातोरात मिळालेली प्रसिद्ध लयास गेली. त्यावेळी अनेक प्रोजेक्टमधून तिची हकालपट्टी करण्यात आली होती. सध्या ती बिग बॉस OTT म्हध्ये झळकत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.