मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rakhi Sawant: पोलीस स्टेशनच्या बाहेरच कोसळली राखी सावंत; व्हायरल VIDEO ने खळबळ

Rakhi Sawant: पोलीस स्टेशनच्या बाहेरच कोसळली राखी सावंत; व्हायरल VIDEO ने खळबळ

राखी सावंत

राखी सावंत

Rakhi Sawant-Adil Khan Durrani Update: बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटलं जातं. कारण राखी सतत प्रेक्षकांसाठी काही ना काही मनोरंजक गोष्टी करत असते. चाहते राखीला भरभरुन दाददेखील देत असतात. राखी आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 8 फेब्रुवारी-  बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटलं जातं. कारण राखी सतत प्रेक्षकांसाठी काही ना काही मनोरंजक गोष्टी करत असते. चाहते राखीला भरभरुन दाददेखील देत असतात. सध्या राखी आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. राखी सावंतने आपल्या पतीवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच पोलिसांनी आदिल खान दुर्रानीला अटकसुद्धा केली आहे. दरम्यान मीडियाशी संवाद साधताना राखी सावंत अचानक खाली कोसळली आणि एकच गोंधळ माजला. पाहूया नेमकं काय घडलंय.

राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यापासून राखीच्या आयुष्यात विविध गोष्टी घडत आहे. सुरुवातीला अभिनेत्रींच्या आईला ब्रेन ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. राखीची आई अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेत होती. परंतु दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. दरम्यान राखी सावंतच्या लग्नाचं सत्य समोर आलं.

(हे वाचा:Adil khan durrani: मोठी बातमी! राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक; 'हे' आहे कारण )

राखी सावंतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपलं लग्न झाल्याचं सत्य सांगितलं. इतकंच नव्हे तर आदिलने आपल्यासोबत लग्न करुन आपल्याला फसवल्याचा आरोप राखीने केला होता. आपलं सात महिन्यापूर्वीच लग्न झालं आहे. तरीसुद्धा आदिल इतर मुलीसोबत नात्यात असल्याचा खुलासा राखीने केला होता. दरम्यान काही दिवसांनी आदिलने स्वतः आपलं लग्न झाल्याचं सांगत राखीला आपली पत्नी म्हटलं होतं. त्यांनतर सर्वकाही सुरळीत झालं होतं.

मात्र राखीच्या आईच्या निधनानंतर पुन्हा एकदा राखी आणि आदिलमध्ये वाद निर्माण झाला आहे. आदिल आपल्याला पुन्हा फसवत असल्याचं राखीचा म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर तो आपल्याला सोडून आता गर्लफ्रेंडसोबत राहणार असल्याचं राखीने म्हटलं होतं. अशातच आदिलने आपल्याला मारहाण केल्याचं सांगत राखीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांनतर मुंबई पोलिसांनी आदिल खान दुर्रानीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

आदिलच्या अटकेनंतर ओशिवारा पोलीस स्टेशनमधून बाहेर येताना मीडियाने राखी सावंतसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बोलताना राखी अचानक खाली कोसळली. तिचा भाऊ आणि मैत्रिणीने तिला सांभाळत पाणी प्यायला दिलं आणि तिला कारमध्ये बसवलं. राखीच्या अचानक कोसळण्याने सर्वचजण घाबरले. परंतु काही वेळानंतर अभिनेत्री ठीक झाली. सध्या सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Entertainment, Rakhi sawant