मुंबई, 12 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंत सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्याचं दिसून येत आहे. आईचं आजारपण, निधन आणि आता पतीकडून फसवणूक अशा अनेक गोष्टींना राखी सामोरं जात आहे. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अभिनेत्रीने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यावर ऍक्शन घेत पोलिसांनी आदिलला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता आदिलच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. एका इराणी मुलीने आदिलवर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. राखी सावंतचा पती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अशातच आता आदिलच्या अडचणी आणखी वाढल्याचं समोर आलं आहे. मैसूरमध्ये एका इराणी मुलीने आदिलवर बलात्काराचा आरोप करत एफआरआय दाखल केला आहे. ही मुलगी एक विद्यार्थिनी आहे. या मुलीने मैसूरच्या व्हीव्ही पुरम ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इराणी मुलगी डॉक्टर ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी आहे. ती शिक्षणासाठी भारतात अली आहे. (हे वाचा: Rakhi Sawant-Adil Durrani: ‘आदिलने माझे न्यूड VIDEO…; राखी सावंतचा पतीवर धक्कादायक आरोप ) रिपोर्ट्सनुसार मुलीने सांगितलं की, ती डेझर्ट लॅब फूड अड्डा याठिकाणी आदिल खान दुर्रानीला पहिल्यांदा भेटली होती. आदिलच या फूड अड्डाचा मालक होता.याठिकाणी सतत येणं-जाणं असल्याने आदिल आणि त्या मुलीमध्ये जवळीकता वाढली होती. त्यांनतर आदिल या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या रिपोर्ट्सनुसार, मुलीने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे की, लग्नाचं आमिष दाखवून आदिलने मैसूरच्या एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर बलात्कार केला आहे. या अपार्टमेंटमध्ये ते दोघे सोबत राहात होते. त्यांनतर 5 महिन्यांनी जेव्हा या मुलीने आदिल दुर्रानीजवळ लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आदिलने तिला नकार दिला. आणि अशा मुलींसोबत आपलं असंच नातं असल्याचं म्हटलं.
या मुलीने आपल्या तक्रारीत पुढे सांगितलं आहे की, जेव्हा तिने आदिलला पोलिसांत जाण्याची धमकी दिली तेव्हा त्याने दोन वेगळ्या मोबाईल नंबरवरील स्नॅपचॅटवर काही इंटिमेट फोटो पाठवले होते. जर तिने पोलिसांत तक्रार केली तर हे फोटो तिच्या पालकांना पाठवण्याची आणि सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी आदिलने दिल्याचं त्या मुलीने म्हटलं आहे.