मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rakhi Sawant: 'एंटरटेंनमेंट क्वीन' राखी सावंतचं हे आहे खरं नाव; या कारणामुळे बदललं

Rakhi Sawant: 'एंटरटेंनमेंट क्वीन' राखी सावंतचं हे आहे खरं नाव; या कारणामुळे बदललं

राखी सावंत

राखी सावंत

आज राखी सावंतचा वाढदिवस असून ती तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. राखीच्या खास दिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 25 नोव्हेंबर :  'एंटरटेंनमेंट क्वीन' आणि 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत चर्चेत असते. कोणत्या न कोणत्या कारणामुळे ती प्रसिद्धी झोतात येत असते. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हिडीओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत असतात. आज राखी सावंतचा वाढदिवस असून ती तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. राखीच्या खास दिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

राखीचं आयुष्य खूप संघर्षाचं राहिलं आहे. राखी सावंतचा जन्म 25 नोव्हेंबर 1978 रोजी झाला असून तिचं खरं नाव नीरू भेडा आहे. तिच्या आईने कॉन्स्टेबल आनंद सावंत यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. यानंतर राखीनं तिच्या दुसऱ्या वडिलांचं आडनाव वापरण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणींमुळे राखीने वयाच्या 10व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. राखीने अनिल आणि टीना अंबानीच्या लग्नात वेटर म्हणूनही काम केलं आहे. राखीने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

1997 मध्ये राखीला 'अग्निचक्र' हा चित्रपट मिळाला, ज्यासाठी तिनं तिचं नाव बदलून रुही सावंत ठेवलं. यानंतर तिनं 'जोरू का गुलाम', 'जिस देश में गंगा रहता है'मध्ये काम केलं. त्यानंतर राखीने 'नच बलिये'मध्ये परफॉर्म केले. 2003 मध्ये तिने 'चुरा लिया है तुमने' चित्रपटातील आयटम नंबरसाठी ऑडिशन दिले होते. राखीने या आयटम नंबरसाठी चार वेळा ऑडिशन दिले होते आणि नंतर तिचं सिलेक्शन झालं.  2003 मध्ये, जेव्हा राखीने 'मोहब्बत है मिर्ची' मधून तिचा डान्स दाखवला तेव्हा तिला लोकांनी पसंती दिली. हिमेश रेशमियानं हे गाणे संगीतबद्ध केलं होतं. यानंतर राखीला चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका मिळू लागल्या. 2005 मध्ये ती 'परदेसिया' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आणि हे गाणंही हिट झालं.

दरम्यान, राखीने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता तेव्हापासून ती घराघरांत पोहचली. बिग बॉसमुळे राखीची लोकप्रियता आणखीनच वाढली. लोकांचं मनोरंजन करत असल्यामुळे लोक राखीला खूप पसंत करु लागले. राखी तिच्या लव्ह लाईफमुळेही सतत चर्चेत असते. सध्या ती उद्योगपती आदिल खानला डेट करत आहे.

First published:

Tags: Birthday, Bollywood, Bollywood actress, Entertainment, Rakhi sawant, Rakhi Sawant (TV Actor)