जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मुंबई-कानपुर नव्हे तर 'या' ठिकाणी होणार राजू श्रीवास्तववर अंत्यसंस्कार; काय आहे कारण?

मुंबई-कानपुर नव्हे तर 'या' ठिकाणी होणार राजू श्रीवास्तववर अंत्यसंस्कार; काय आहे कारण?

Raju Srivastav health update

Raju Srivastav health update

लोकप्रिय कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं काल निधन झालं आहे. तब्बल 41 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. जड अंतःकरणाने, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 सप्टेंबर-  लोकप्रिय कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचं काल निधन झालं आहे. तब्बल 41 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. जड अंतःकरणाने, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु आहे. काल या महान कलाकाराने अखेरचा श्वास घेतला आणि देशभरात शोककळा पसरली. दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरु होते. यांचा मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे होणार याची चर्चा आहे. याआधी राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव कानपूर किंवा मुंबईला नेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु अचानक हा निर्णय बदलण्यात आला आहे. आपल्या कॉमेडीने पोट धरुन हसायला भाग पाडणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपूर येथे झाला होता. अशा स्थितीत त्यांच्या मृत्यूची बातमी येताच त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावीच अंत्यसंस्कार होणार, असा विचार सर्वांच्या मनात आला. चाहत्यांना त्यांचं शेवटचं दर्शन घेता यावं अशी अनेकांची इच्छा होती. दुसरीकडे राजूचं काम मुंबईतूनच होत होतं आणि इथूनच त्याने आपली नवी ओळख निर्माण केली होती. अशा स्थितीत त्यांचे पार्थिव मुंबईला नेणं योग्य ठरेल, असं काहींचं मत होतं. परंतु हे दोन्ही अंदाज चुकीचे ठरले आहेत. विचारपूर्वक चर्चनंतर कुटुंबीय आणि मित्रांनी मिळून दिल्लीतच राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक राजूवर बरेच दिवस झालं दिल्लीत उपचार सुरु होते. राजू यांच्या पत्नी आणि मुलेही दिल्लीत त्यांच्या पुतण्यासोबतच होती. रुग्णालयातून राजू श्रीवास्तव यांचा मृतदेहही दिल्लीतील त्यांच्या पुतण्याच्या घरी आणण्यात आला होता. अशा परिस्थितीत गैरसोय टाळण्यासाठी राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. **(हे वाचा:** भावाच्या लग्नात जडलं प्रेम, 12 वर्षे केली प्रतीक्षा; फिल्मी आहे राजू श्रीवास्तव यांची Love Story ) राजू श्रीवास्तव हे प्रचंड लोकप्रिय कलाकार होते. अशा परिस्थितीत राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव त्यांच्या चाहत्यांसाठी सकाळी आठ वाजल्यापासून पुतण्याच्या निवासस्थानी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी साडेनऊ वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. श्रद्धांजली सभेनंतर राजू निगमबोध घाटावर पंचतत्त्वात विलीन होतील. द्वारका येथील राजू श्रीवास्तव यांच्या पुतण्याच्या घरी सध्या सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी होऊ लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात