मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rajkumar Rao च्या पत्नीनं लग्नाच्या ड्रेसवर बंगालीत लिहिला हा मंत्र; फारच खास आहे याचा अर्थ

Rajkumar Rao च्या पत्नीनं लग्नाच्या ड्रेसवर बंगालीत लिहिला हा मंत्र; फारच खास आहे याचा अर्थ

 राजकुमार रावने  (Rajkumar Rao)  गर्लफ्रेंड अभिनेत्री पत्रलेखासोबतच्या  (Patralekha)  त्याच्या 11 वर्षांच्या रिलेशनशिपला लग्नाचं  (Wedding)  नाव दिलं आहे.

राजकुमार रावने (Rajkumar Rao) गर्लफ्रेंड अभिनेत्री पत्रलेखासोबतच्या (Patralekha) त्याच्या 11 वर्षांच्या रिलेशनशिपला लग्नाचं (Wedding) नाव दिलं आहे.

राजकुमार रावने (Rajkumar Rao) गर्लफ्रेंड अभिनेत्री पत्रलेखासोबतच्या (Patralekha) त्याच्या 11 वर्षांच्या रिलेशनशिपला लग्नाचं (Wedding) नाव दिलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 नोव्हेंबर-  राजकुमार रावने  (Rajkumar Rao)  गर्लफ्रेंड अभिनेत्री पत्रलेखासोबतच्या  (Patralekha)  त्याच्या 11 वर्षांच्या रिलेशनशिपला लग्नाचं  (Wedding)  नाव दिलं आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाइट्स’ या चित्रपटातून एकमेकांच्या जवळ आलेले राज आणि पत्रलेखा यांची प्रेमकहाणी त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. राजकुमारच्या संघर्षाचे दिवस असोत किंवा पत्रलेखाला सोशल मीडियावर ट्रोलिंगला बळी पडावे लागले असेल… अशी वेळ कधी आली नाही की या जोडीने एकमेकांना साथ दिली नाही. सोमवारी चंदीगडमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांनी लग्न केलं आहे.अशात नववधू बनलेली पत्रलेखा लाल साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. केवळ सौंदर्यच नाही तर पत्रलेखाने लग्नात घातलेला दुपट्टाही तिच्या प्रेमाचा संदेश देताना दिसत होता.

पत्रलेखाचे पूर्ण नाव पत्रलेखा पॉल असून ती बंगाली आहे. अशा परिस्थितीत या दुपट्ट्यावर अभिनेत्रीचा प्रेमाचा संदेशही बंगालीमध्ये लिहिलेला दिसत होता. लग्नानंतर लगेचच दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा खूपच सुंदर दिसत आहेत. दोघेही फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या डिझायनर जोड्यामध्ये दिसले. पत्रलेखाने सुंदर लाल साडी नेसली होती. आणि सोबत लाल जाळीची ओढणी घेतली होती .या दुपट्ट्यावर प्रेम व्यक्त करणारा संदेश दिसत होता.

या वर बंगाली भाषेत खऱ्या प्रेमाचा मंत्र लिहिला होता. याचा मराठीत अर्थ आहे... ‘मी माझे हृदय तुला पूर्ण प्रेमाने समर्पित करतो...’ लग्नाच्या जोडप्यावर तुमचा प्रेम संदेश लिहिण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. पत्रलेखाच्या आधी, अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील तिच्या लग्नात दुपट्टा परिधान करताना दिसली होती, ज्यावर लिहिले होते, 'सदा सौभाग्यवती भव:' तिचा लेहेंगा देखील सब्यसाचीने डिझाइन केला होता.

लग्नानंतर दोन्ही स्टार्सनी त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत राजकुमारने लिहिले की, 'अखेर 11 वर्षांच्या प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मस्तीनंतर, आज मी माझ्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींशी लग्न करत आहे... माझी सोबती, माझी चांगली मैत्रीण, माझे कुटुंब. आज तु पतीला पती म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद नाही पत्रलेखा. याचवेळी पत्रलेखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आज माझ्याकडे जे काही आहे त्याच्याशी मी लग्न केले आहे; माझा प्रियकर, माझे कुटुंब, माझा सोबती… गेल्या 11 वर्षांपासून माझा सर्वात चांगला मित्र! तुमची पत्नी होण्यापेक्षा मोठी भावना नाही!

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Rajkumar rao