मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /घटस्फोटानंतर Aishwaryaa Rajinikanth कोरोना पॉझिटीव्ह, हॉस्पिटलमध्ये दाखल

घटस्फोटानंतर Aishwaryaa Rajinikanth कोरोना पॉझिटीव्ह, हॉस्पिटलमध्ये दाखल

Aishwaryaa Rajinikanth

Aishwaryaa Rajinikanth

अभिनेता धनुष (Dhanush)आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth )त्यांच 18 वर्षांचं नातं संपवत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुर्णविराम मिळतो तोच ऐश्वार्या रजनीकांत संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: अभिनेता धनुष (Dhanush)आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwaryaa Rajinikanth )त्यांच 18 वर्षांचं नातं संपवत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुर्णविराम मिळतो तोच ऐश्वार्या रजनीकांत संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐश्वार्याला कोरोनाची लागण (Aishwaryaa Rajinikanth Corona Positive) झाली आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

ऐश्वर्याने ने आपल्या इंस्टाग्राम वर शॉकिंग फोटो शेअर केला आहे. सगळं नियम अटी सावधानता बाळगुनही मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशी माहिती देत कृपया मास्क परिधान करा आणि व्हॅक्सीन घेणे गरजेचे आहे. सुरक्षित राहा. 2022 मध्येही आला आहे. असे आवाहन तिने कॅप्शनमध्ये केले आहे.

ऐश्वर्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या हाताला आयव्ही लावली असल्याचे दिसते. तिची प्रकृती स्थिर नसल्याचे कळते.

धनुषने ट्विट करत दिली होती घटस्फोटाची माहिती

या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. धनुष म्हणतो की,'18 वर्षांची सोबत, मैत्री, दाम्पत्य , पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक एकमेकांच्या साथीने, समजूतदारपणाने आणि विश्वासाने मार्ग स्वीकारला. आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत. जेथून आमचे मार्ग वेगळे होत आहे. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वतःला शोधण्याचा निर्णय घेणार आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर खरा. खासगी बाब असल्याच लक्षात ठेवा. एकमेकांसोबत ही गोष्ट करू द्या.'

ऐश्वर्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. या दोघांचं लग्न 200 मध्ये झाले होते. या दोघांना दोन मुलं आहेत. यात्रा आणि लिंगा. त्यांचा जन्म 2006 आणि 2010 मध्ये झाला आहे.

तसेच धनुष हा लोकप्रिय निर्माता कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष हा मल्टीटॅलेंटेड आहे. तो अभिनेता होण्यासोबतच दिग्दर्शक, प्रोड्युसर, डान्सर, प्लेबॅक सिंगर, लिरिसिस्ट आणि स्क्रीनप्ले रायटर आहे. 46 सिनेमांत काम केलेल्या सुपरस्टार धनुषला आतापर्यंत एक फिल्म फेअर अवॉर्ड, 4नॅशनल फिल्म अवॉर्डसह 13 मोठे पुरस्कार मिळाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Rajnikant, Superstar rajnikant