मुंबई, 28 मे- 70-80च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि दमदार अभिनयाने परिपूर्ण अशा काही अभिनेत्री होत्या. त्यातीलच एक म्हणजे मौसमी चॅटर्जी होय. मौसमी चॅटर्जी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘रोटी, कपडा और मकान’, ‘अनुराग’, ‘मंझिल’, ‘घर एक मंदिर’, ‘अंगूर’ आणि ‘कच्चे धागे’ असे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्या काळात मौसमी अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर देत असत. पण, चेहऱ्यावरुन अतिशय निरागस दिसणारी मौसमी स्वभावाने रोखठोक होती. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांना हे चांगलंच माहिती होतं. मौसमी चॅटर्जी यांचा राग इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींनी अनुभवला आहे. सदाबहार अभिनेत्री रेखा यांनासुद्धा काही कारणात्सव मौसमीच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार समजले जाणारे राजेश खन्नासुद्धा मौसमीच्या रागापासून स्वतःचा बचाव करु शकले नाहीत. एकदा राजेश खन्ना यांनी मौसमी चॅटर्जीला असा काही प्रश्न विचारला होता की, ते ऐकून मौसमी रागाने लालबुंद झाल्या होत्या. आज आपण या किस्स्याबाबतच जाणून घेणार आहोत. (हे वाचा:3 वेळा मोडलं लग्न,दोनदा सोसल्या कॅन्सरच्या यातना; सुंदर अभिनेत्रीचा भयानक शेवट ) मौसमी चॅटर्जी यांनी लेहरे रेट्रोला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. त्यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. अभिनेत्रीने सांगितलं होतं की, जेव्हा ती गरोदर होती, तेव्हा राजेश खन्ना यांनी तिला असा प्रश्न विचारला की तिला राग आला आणि तिने देखील अभिनेत्याला त्याच्या प्रश्नाचं चोख उत्तर दिलं होतं. अभिनेत्रीने सांगितलं की, जेव्हा ती गरोदर होती, तेव्हा राजेश खन्ना यांनी तिला तिच्या मुलाच्या वडिलांबद्दल एक प्रश्न विचारला होता, जो तिला अजिबात आवडला नाही. राजेश खन्ना यांनी मौसमी चॅटर्जीला विचारलं होतं की, विनोद मेहरा हे तिच्या होणाऱ्या मुलाचे वडील आहेत का? मौसमीला हे ऐकून इतकं वाईट वाटलं की, तिने लगेच अभिनेत्याला फटकारलं. आणि त्यांना त्याच्या दोन मुलींबद्दल प्रश्न विचारला. राजेश खन्ना यांना त्यांच्याच शैलीत धडा शिकवत मौसमी यांनी विचारलं की, ‘डिंपल कपाडियाच्या दोन मुली तुमच्यासोबत आहेत की ऋषी कपूरसोबत’.
मौसमी चॅटर्जीचा हा तडकाफडकी अंदाज पाहून राजेश खन्नाही थक्क झाले होते. दरम्यान, मौसमीने असंही सांगितलं की, राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये ती त्यांना भेटायला गेली होती. मौसमी आपल्या मुलीसोबत काकांना भेटायला गेली होती. जिथे राजेश खन्ना यांनी मौसमी चॅटर्जीच्या मुलीसोबतच अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं. मौसमी चॅटर्जी यांचं लग्न जयंत मुखर्जीसोबत खूपच कमी वयात झालं होतं. लग्नानंतर दोघेही दोन मुलांचे आई-वडील झाले, मात्र त्यांच्या मोठ्या मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता.

)







