• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम? राज कपूर यांचा भन्नाट किस्सा

रशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम? राज कपूर यांचा भन्नाट किस्सा

चित्रपटामध्ये सेनियाने एका सर्कसमध्ये काम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. सेनियाला पाहताक्षणी राज कपूर तिच्या प्रेमात पडतात, असं काहीसं कथानक चित्रपटामध्ये आहे.

 • Share this:
  मुंबई 26 जुलै: राज कपूर (Raj Kapoor) हे बॉलिवूडमधील शो मॅन म्हणून ओळखले जातात. जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. 1970 साली आलेल्या ‘मेरा नाम जोकर’ (Mera Naam Joker) या कल्ट क्लासिक चित्रपटाचे फॅन्स केवळ भारतातच नाहीत, तर रशिया, चीन, अमेरिका आणि अगदी मिडल इस्टमध्येही भेटतात. या चित्रपटात अभिनेत्री म्हणून रशियाच्या प्रसिद्ध बॅले डान्सर (Russian Ballet dancer) सेनिया रेबेंकिना (Ksenia Ryabinkina) यांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, कोणत्याही ऑडिशनशिवाय, केवळ त्यांचा डान्स पाहून प्रभावित झालेल्या राज कपूर (Raj Kapoor impressed by ballet dance) यांनी त्यांची या चित्रपटासाठी निवड केली होती. 2016 मध्ये राज कपूर यांच्या 92व्या जयंती निमित्त सेनिया भारतात आल्या होत्या. त्यावेळी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज कपूर आणि या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा (Ksenia Ryabinkina on Raj Kapoor) दिला होता. त्यांनी सांगितलं होतं, की ‘मेरा नाम जोकर’पूर्वी त्यांनी एका चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यानंतरही त्यांनी सुमारे 15-16 चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’मधील माझं कामच लोकांच्या लक्षात आहे. ‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती राज कपूर आणि सेनिया (Raj Kapoor and Ksenia) यांची मॉस्कोमध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आपण 24-25 वर्षांच्या असू, असं सेनिया यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. राज कपूर आपल्या चित्रपटाच्या तयारीसाठी मॉस्कोला गेले होते. यावेळी त्यांनी सेनिया यांचा बॅले डान्स पाहिला. त्यांना हा डान्स एवढा आवडला, की त्यांनी सेनिया यांना थेट चित्रपटाची ऑफर दिली. रशियन असलेल्या सेनिया यांना जराही हिंदी येत नव्हती. मात्र, राज कपूर यांच्या आधीच्या चित्रपटांतील काही गाणी रशियामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे (Raj Kapoor songs) सेनिया त्यांना ओळखत होत्या. त्यामुळे, त्यांनी चित्रपटासाठी होकार कळवला. मराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती चित्रपटामध्ये सेनियाने एका सर्कसमध्ये काम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. सेनियाला पाहताक्षणी राज कपूर तिच्या प्रेमात पडतात, असं काहीसं कथानक चित्रपटामध्ये आहे. सेनिया यांना हिंदी कळत नसूनही चित्रपटामध्ये राज-सेनिया यांची उत्तम केमिस्ट्री (Raj Kapoor Ksenia chemistry) पहायला मिळाली होती. सेनिया यांनी सांगितलं, की चित्रपटाच्या सेटवर राज कपूर त्यांची भरपूर काळजी घेत. सेटवर इतर वेळी खेळीमेळीचं वातावरण असायचं. मात्र, कॅमेरा ऑन होताच राज कपूर अगदी कडक वागत. ‘मेरा नाम जोकर’च्या निर्मितीसाठी राज कपूर यांनी आपली सर्व संपत्ती खर्च केली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चाललाच नाही. त्यामुळे राज कपूर पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते. असं म्हटलं जातं, की हा सिनेमा काळाच्या पुढचा होता. त्यामुळे सत्तरच्या दशकातील प्रेक्षकांना तो समजला नाही. नंतर मात्र, या सिनेमाची लोकप्रियता एवढी वाढली, की आज क्लासिक सिनेमांमध्ये याला मानाचं स्थान आहे.
  First published: