मुंबई, 4 मार्च- बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ गायक उदित नारायण यांच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला आहे. कारण ते आजोबा बनले आहेत. अर्थातच अभिनेता, होस्ट, गायक आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल आईबाबा बनले आहेत. नुकतंच आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली आहे. आदित्य नारायण आणि श्वेताला कन्यारत्न प्राप्त झालं आहे (Aditya Narayan-Shweta Agarwal Blessed With Baby Girl). त्याच्या आयुष्यात आता एका गोंडस लेकीचं आगमन झालं आहे. आदित्य नारायणने वडील झाल्याची ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला आणि श्वेताचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘मी आणि श्वेता धन्य झालो. आम्हाला हे सांगताना प्रचंड आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं आहे’. या पोस्टनंतर आदित्य आणि श्वेताच्या चाहत्यांसोबतच त्यांचे मनोरंजनसृष्टीतील मित्र-मैत्रिणी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत’.
नुकतंच आदित्य नारायणने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, 24 फेब्रुवारी रोजी तिच्या पत्नीने मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. तो म्हणाला की, श्वेताला गरोदरपणात पाहिल्यानंतर सर्वजण म्हणायचे की तिला मुलगा होईल, परंतु मला नेहमीच वाटत होते की माझं पहिलं आपत्य मुलगी असावी आणि यासाठी मी देवाची प्रार्थनाही केली, जी त्याने मान्य केली’. (हे वाचा: लग्नाच्या काही दिवसातच शिबानीनं Insta Bioमधून हटवलं ‘मिसेस अख्तर’ ) तो पुढे म्हणाला, जेव्हा श्वेताने मुलीला जन्म दिला तेव्हा मी तिच्यासोबत होतो. तो क्षण पाहून आणि तिला प्रचंड वेदना होत असताना पाहून मला जाणवलं की एवढी ताकद फक्त स्त्रीमध्येच असू शकते. हे सर्व पाहिल्यानंतर माझे श्वेताबद्दलचे प्रेम आणि आदर आता द्विगुणित झालं आहे. त्याने म्हटलं की, मी पाहिले आहे की, जेव्हा एखादी महिला मुलाला जन्म देते आणि गर्भधारणेच्या टप्प्यातून जाते तेव्हा तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.