मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘असा मेसेज आल्यास व्हा अलर्ट’; आर. माधवन यानं देशवासीयांना केलं सावध

‘असा मेसेज आल्यास व्हा अलर्ट’; आर. माधवन यानं देशवासीयांना केलं सावध

अभिनेता आर. माधवन (R. Madhavan) यानं संताप व्यक्त केला आहे. त्यानं व्हायरल होणारा एक मेसेज पोस्ट केला, अन् हा मेसेज आल्यास सावध राहा, अशी विनंती त्यानं देशवासीयांना केली आहे.

मुंबई 1 मे: देशभरात सध्या कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या फार वेगाने वाढतेय. त्यामुळं औषध, लसी, ऑक्सिजन यांसारख्या वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. प्रशासन आणि सामाजिक संस्था आपापल्या परीनं प्रयत्न करतायेत. परंतु या तुटवड्यामुळं अनेक रुग्णांचे प्राण गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही काही विकृत प्रवृत्तीची मंडळी लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक फसवणुक करताना दिसत आहेत. (Crime during corona pandemic) अशा गुन्हेगारांवर अभिनेता आर. माधवन (R. Madhavan) यानं संताप व्यक्त केला आहे. त्यानं व्हायरल होणारा एक मेसेज पोस्ट केला, अन् हा मेसेज आल्यास सावध राहा, अशी विनंती त्यानं देशवासीयांना केली आहे.

“फ्रॉड अलर्ट.. मिस्टर अजय अग्रवाल 3 हजार रुपयात रेमडेसिवीर उपल्बध करून देत आहेत. ते तुमच्याकडून IMPS च्या माध्यमातून एडवान्समध्ये पेसै मागतील. 3 तासाच भारतात कुठेही औषध उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगतील. मात्र त्यानंतर ते फोन उचलणार नाहीत. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान. हा माणूस फसवणूक करणारा आहे.” अशा आशयाची पोस्ट करुन आर. माधवन यानं देशवासीयांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

ट्रोल होताच आलिया भट्टनं सुरु केलं Social work; रुग्णांना अशी करतेय मदत

तीन दिवस लसीकरण बंद

कोरोना प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccine) घेण्यासाठी मुंबईकर लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा (Covid19 vaccine shortage) जाणवत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण होणार नसल्याची (Vaccination paused in Mumbai) माहिती समोर आली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Entertainment, Online fraud