Home /News /entertainment /

Vijay Deverakonda ला डेट करण्याच्या चर्चांवर Rashmika ने सोडलं मौन, म्हणाली...

Vijay Deverakonda ला डेट करण्याच्या चर्चांवर Rashmika ने सोडलं मौन, म्हणाली...

रश्मिका सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत (Vijay Deverakonda) रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे डेट (Rashmika Mandanna and Vijay Deverakonda) करत आहेत, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे.

मुंबई, 18 फेब्रुवारी: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी पुष्पा स्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रश्मिका मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा' (Rashmika Mandanna in Pushpa) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ती चित्रपटामुळे नाही, तर आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रश्मिका सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत (Vijay Deverakonda) रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे डेट (Rashmika Mandanna and Vijay Deverakonda) करत आहेत, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. रश्मिका आणि विजय दोघांनी यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी दोघंही गोव्याला गेले होते. रश्मिकाने गोव्यातला नवीन वर्षाचं स्वागत करणारा फोटो शेअर केला. त्या एका फोटोवरून रश्मिका आणि विजय दोघांनी गोव्यात एकत्र सुट्टी व्यतीत केल्याचा कयास लावला गेला होता. याशिवाय दोघे अनेकदा डिनर डेट आणि जिममध्येही स्पॉट झाले आहेत.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा खरोखरच एकमेकांना डेट करत आहेत का? नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान रश्मिका मंदानाला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तिनं सांगितलं, की 'अफेअरच्या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण देऊन मी आता थकले आहे. हे सर्व एका अभिनेत्याच्या आयुष्याचा भाग आहे, असं मला वाटतं. म्हणून मी आता अफेअरच्या अफवांवर प्रतिक्रिया देत नाही.' याबाबत बॉलिवूड लाइफने वृत्त दिलं आहे. हे वाचा-VIDEO: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या मेहंदी समारंभात थिरकली रिया चक्रवर्ती मुलाखतीदरम्यान रश्मिकाला तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दलही (Rashmika Mandanna On Marriage Plans) प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'या क्षणी लग्नाबद्दल मी आणखी विचार केला नाही. कारण मी सध्या यासाठी खूप लहान आहे. अशा एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही असलं पाहिजं, जी तुम्हाला कम्फर्ट देते.' प्रेमाबद्दल तिला विचारण्यात आल्यावर, ती म्हणाली, की 'प्रेम हे एकमेकांचा आदर करणे आहे. प्रेमाचं वर्णन करणं कठीण आहे. कारण हा भावनांशी जोडलेला विषय आहे. प्रेमाचं वर्णन करणं कठीण आहे.' या वेळी रश्मिकाने विजयसोबतच्या नात्यावर मौन बाळगलं.
रश्मिका आणि विजयची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आहे. रश्मिका आणि विजयची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडली आहे. त्यांच्या नात्याच्या चर्चा अनेकवेळा समोर आल्या; पण दोघांनी एकमेकांचे फक्त चांगले मित्र असल्याचं वारंवार सांगितलं.
First published:

Tags: Rashmika mandanna, Tollywood, Vijay deverakonda

पुढील बातम्या