मुंबई, 06 जून: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदान्ना. फक्त साऊथच नाही तर बॉलिवूडकरांना देखील तिची क्रेझ आहे. मागच्या वर्षात आलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटात तिने श्रीवल्ली ही भूमिका साकारत सगळ्यांनाच वेड लावले होते. आता ‘पुष्पा’ च्या पुढच्या भागात देखील ती दिसणार आहे. एवढंच नाही तर रश्मीकाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. रश्मिकाचं नाव साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडा सोबत नेहमीच जोडलं जातं. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. पण खूप कमी लोकांना माहिती आहे कि रश्मीकाचा याआधी एक साखरपुडा झाला होता. मग का मोडलं या अभिनेत्रीचं लग्न जाणून घ्या. रश्मिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि तिचे फॅन फॉलोइंगही खूप आहे. नेहमी आपल्या हसण्याने सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या रश्मिकावर एक वेळ अशी आली होती, जेव्हा ती खूप अस्वस्थ होती. 2018 साली तिची रक्षित शेट्टीसोबतची एंगेजमेंट तुटली होती आणि दोघेही त्यावरून खूप नाराज होते.
‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीचा भाऊ रक्षित शेट्टी आज त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. 6 जून 1983 रोजी जन्मलेला रक्षित हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रक्षित यांनी 2010 मध्ये अभिनय विश्वात प्रवेश केला. भाऊ ऋषभच्या ‘क्रिक पार्टी’ चित्रपटादरम्यान रक्षितची रश्मिकाशी भेट झाली. दोघे लवकरच चांगले मित्र बनले आणि नंतर प्रेमात पडले. यानंतर, 3 जुलै 2017 रोजी दोघांनी एका खाजगी समारंभात साखरपुडा केला. Swara Bhaskar Pregnant: शेवटी अफवा खऱ्या ठरल्या! स्वरा भास्कर लवकरच आई होणार, फोटो शेअर करत दिली Good News रश्मिका आणि रक्षितमध्ये काही काळ सर्व काही सुरळीत चालले होते, पण हळूहळू त्यांच्यात भांडणं होऊ लागले. सप्टेंबर 2018 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने लग्न तोडले पण हा काळ दोघांसाठी खूप कठीण होता. रश्मिका आणि रक्षित यांच्या करिअरचा हा सर्वोच्च काळ होता आणि त्यावेळी दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं होतं. एंगेजमेंट तुटल्यानंतर झाल्यानंतर रश्मिकाची आई सुमन म्हणाली होती की, ‘आम्ही सर्व खूप अस्वस्थ आहोत आणि या कठीण काळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येकासाठी त्यांचे जीवन प्रथम येते. कोणालाही दुखवायचे नाही आणि प्रत्येकाने आनंदी राहावे अशी आमची इच्छा आहे.’
रश्मिकाने तिच्या कुटुंबीयांशी आणि मित्रमंडळींशी चर्चा करून एंगेजमेंट तोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. रश्मिका आणि रक्षित यांच्या नात्यात काही अर्थ उरला नव्हता म्हणून लवकरच दोघांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रश्मिकाचे नाव विजय देवरकोंडासोबत जोडले जाते.