मुंबई, 31 मे- अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा-द राइज’ हा सिनेमा सुपरहिट झाला. आजही या सिनेमातील गाण्यांची क्रेझ कमी झालेली नाही. या सिनेमानं बॉलिवूडलाही झोडपून काढलं, आता या सिनेमाचा लवकरच दुसरा भाग ‘पुष्पा-द रूल’ येत आहे. पण आता या सिनेमाबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून घरी निघालेल्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन कलाकार जखमी झाल्याचे समोर आलं आहे. पुष्पा-2’ चित्रपटाचे चित्रीकरण संपवून तेलंगणाहूंन हैदराबादला ही बस निघाली होती. या बसमध्ये चित्रपटातील कलाकारही होते. परंतु वाटेतच या बसचा अपघात झाला आहे. नलगोंडा हैदराबाद विजयवाडा येथील नलगोंडा रस्त्यावर ‘पुष्पा 2’ची च्या कलाकारांची बस एका आरटीसी बसला धडकली. यामध्ये दोन कलाकार जखमी झाले आहेत.या अपघतानंतर जखमी कलाकारांना उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Oh No! 'Pushpa 2' Artists Meet With A Bus ACCIDENT (Details Inside)https://t.co/Gj8ztW7nV4@alluarjun #Pushpa2 #alluarjun #BusAccident
— FridayRelease (@FridayRelease77) May 31, 2023
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा द राइज हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातील लूक शेअर केला होता.
काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा-द रूल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. अल्लू अर्जुन च्या वाढदिवशी आपल्या या चित्रपटाची टीझर ची झलक पाहायला मिळाली होती. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन तुरुंगातून पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. पुष्पा जंगलात कुठे तरी जाऊन बसल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले होते. चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकानं पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती.