मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मला आई व्हायचंय, परंतु....' प्रियांका चोप्राचा फॅमिली प्लॅनिंगवर मोठा खुलासा

'मला आई व्हायचंय, परंतु....' प्रियांका चोप्राचा फॅमिली प्लॅनिंगवर मोठा खुलासा

 निक जोनास  (Nick Jonas)   आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा  (Priyanka Chopra)   हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.

निक जोनास (Nick Jonas) आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.

निक जोनास (Nick Jonas) आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.

मुंबई, 14 जानेवारी-   पॉप स्टार निक जोनास  (Nick Jonas)   आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा  (Priyanka Chopra)   हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. कायम सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करून ते आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. 1 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती. गेल्या महिन्यात या इंडो-अमेरिकन जोडप्याच्या लग्नाला तीन  (Nick Priyanka Marriage)   वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना त्यांच्याकडून गुड न्यूजची अपेक्षा आहे. निक आणि प्रियांकाला अनेकदा बाळाच्या आगमनाबाबत जाहिरपणे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. आतापर्यंत दोघेही या प्रश्नांना टाळताना दिसत होते. मात्र, आता स्वत: प्रियांकानं आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबत  (Priyanka Chopra Family Planning)  भाष्य केलं आहे. 'निक आणि माझ्या मॅरिड लाईफमध्ये बेबीला (Baby) महत्त्वाचं स्थान आहे. भविष्याचा विचार करून आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे', अशी प्रतिक्रिया प्रियांकानं दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेतून तिनं आई होण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. नवभारत टाइम्सनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

'व्हॅनिटी फेअर' (Vanity Fair) या प्रसिद्ध मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्रानं आपलं काम, फॅमिली आणि फॅमिली प्लॅनिंगबाबत मोकळेपणानं माहिती दिली. आई होणं हे टू-डू लिस्टमध्ये आहे का? असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता. त्यावर तिनं आपलं मत मांडलं. 'स्वत: च घर खरेदी करणं आणि आई होणं या दोन्ही गोष्टी कायम प्रायोरिटीवर आहेत. सध्या निक आणि मी आपापल्या कामात व्यस्त आहोत. अद्याप अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी केलेल्या नाहीत. त्या करण्याची माझी इच्छा आहे. तसं पाहिल्यास आम्ही इतकेही बिझी नाहीत. आम्ही आत्ताही बेबी प्लॅन करू शकतो मात्र, कामाच्या गोंधळात मला फॅमिलीपासून दूर राहणं आवडणार नाही. म्हणून आम्ही विचारपूर्वक बेबी प्लॅनिंग केलेलं आहे. भविष्यात मला आई होणं नक्कीच आवडेल पण, आम्हाला सध्या घाई करायची नाही', असं प्रियांका म्हणाली.

प्रियांकानं यापूर्वीही एकदा बेबीबद्दल जाहीरपणे वक्तव्य केलं होतं. गेल्या वर्षी (2021) नेटफ्लिक्सनं (Netflix) जोनास ब्रदर्सवर (Jonas Brothers) 'द जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट' (The Jonas Brothers Family Roast) नावाचा एक खास शो केला होता. या शोमध्ये प्रियांकानं पती निक आणि त्याच्या भावांची भरपूर खिल्ली उडवली होती. त्यावेळी प्रियांका बेबी प्लॅनिंगबद्दल बोलली होती. 'जोनास ब्रदर्सपैकी आम्ही एकमेव कपल आहोत ज्यांना मूल झालेलं नाही. आता मी सर्वांसमोर हे सांगू इच्छिते की निक आणि मी बेबीचा विचार करत आहोत,' असं प्रियांका म्हणाली होती.

(हे वाचा:कतरिना-विकीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली लोहरी! PHOTO वर होतोय लाईक्सचा वर्षाव)

व्हॅनिटी फेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रियांका आपल्या आईबद्दलही बोलली आहे. 'माझी आई, मधू चोप्रा (Madhu Chopra) एक टिपिकल आई आहे. आशियातील एखाद्या मुलीची आई जसा विचार करते, तसाचं विचार तीसुद्धा करते. तिनं तर मी लग्न करेन, ही आशाच सोडून दिली होती. पण, आता मी लग्न केलं आहे तर ती खूपच जास्त आनंदी आहे,' असं प्रियांकानं सांगितलं.प्रियांकाच्या या मुलाखतीनंतर तिच्या चाहत्यांना ती कधी एकदा खूशखबर देते, याची उत्सुकता लागली आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Nick jonas, Priyanka chopra