जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra: प्रियांका चोप्राचं विदेशातील घर पाहिलंत का? अभिनेत्रीने दाखवली झलक

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राचं विदेशातील घर पाहिलंत का? अभिनेत्रीने दाखवली झलक

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राचं विदेशातील घर पाहिलंत का? अभिनेत्रीने दाखवली झलक

प्रियांका चोप्रा लग्नानंतर विदेशात सेटल झाली आहे. ती पती निक जोनससोबत लॉस एंजेल्समध्ये राहते.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये आपलं स्थान बनवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामध्ये तिला मोठ्या प्रमाणात यशसुद्धा मिळालं आहे. आज ती जागतिक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा देशातच नव्हे जगभरात चाहतावर्ग आहे. चाहत्यांना नेहमीच तिच्याबाबत लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. अभिनेत्रीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सतत आपल्या अपडेट्स देत असते. प्रियांका चोप्रा लग्नानंतर विदेशात सेटल झाली आहे. ती पती निक जोनससोबत लॉस एंजेल्समध्ये राहते. ती सतत आपल्या सोशल मीडियावरुन आपल्या सासरच्या मंडळी आणि कामाबाबतच्या अपडेट्स देत असते. चाहत्यांनाही अभिनेत्रीची विदेशातील लाईफस्टाईल कशी आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या लॉस एंजेल्सच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. प्रियांका चोप्राने काही वेळेपूर्वी इन्स्टाग्रामवर एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या बेडरुमसोबत अटॅच असलेल्या ड्रेसिंग रूमची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेत्रीचं सुंदर फुटवेअर कलेक्शन आणि बॅग कलेक्शन दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर बेडजवळील मोठ्या काचेच्या खिडकीतून बाहेरचं सुंदर दृश्यही पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सध्या प्रचंड पसंत केला जात आहे. **(हे वाचा:** आलिया भट्ट-रणबीर कपूरनंतर आणखी एक प्रसिद्ध कपल बांधणार लग्नगाठ; समोर आली वेडिंग डेट ) कामाच्या बाबतीत सांगायचं तर, प्रियांका गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली नाही. परंतु लवकरच ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत ‘जी ले जरा’ या झोया अख्तरच्या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती सध्या हॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात