मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

निक जोनसचा ‘तो’ HOT व्हिडीओ पाहून प्रियांकानं घेतला होता लग्नाचा निर्णय!

निक जोनसचा ‘तो’ HOT व्हिडीओ पाहून प्रियांकानं घेतला होता लग्नाचा निर्णय!

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरी बद्दल बरेच खुलासे केले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरी बद्दल बरेच खुलासे केले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरी बद्दल बरेच खुलासे केले.

  मुंबई, 17 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. निक आणि प्रियांका मेट गालाच्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा भेटले होते आणि त्यानंतर 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 2018 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकलेलं हे कपल लग्नानंतरही वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिलं. त्यावेळी बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असलेल्या प्रियांकानं निकशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता खुद्द प्रियांकानंच या प्रश्नचं उत्तर दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरी बद्दल बरेच खुलासे केले. याचवेळी तिनं निकशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचं मजेशीर कारणही सांगितलं. निकला डेट करण्याआधी तिनं त्याचा एक व्हिडीओ पाहिला होता. हा व्हिडीओ 2016 मध्ये रिलीज झालेल्या निकच्या एका गाण्याचा आहे. ज्यात तो फक्त अंडरगारमेंटमध्ये दिसत आहे.
  निकचा हा व्हिडीओ पाहून प्रियांका त्याच्यावर इतकी फिदा झाली की, तिनं त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निक-प्रियांका यांनी डिसेंबर 2018 मध्ये उमेदभवन पॅलेस येथे शाही थाटात लग्न केलं. या लग्नात कोणत्याही फोटोग्राफरला येण्यास मनाई होती त्यामुळे बराच काळ त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले नव्हते. पण जेव्हा ते समोर आले. तेव्हा त्यांच्या लग्नाची भव्यता सर्वांनी पाहिली.
  प्रियांकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला तिचा स्काय इज पिंक हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही मात्र या सिनेमाचं समीक्षकांनी कौतुक केलं. लवकरच निक-प्रियांकाच्या संगीत सेरेमनीवर आधारित वेब सीरिज रिलीज होणार आहे.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Nick jonas, Priyanka chopra

  पुढील बातम्या