मुंबई,29 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लोकांना थक्क करत आहे. प्रियांका नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यावर मोकळेपणाने संवाद साधत असते. नुकतंच अभिनेत्रीने आपण बॉलिवूड सोडण्यामागचं धक्कादायक कारण उघड केलं होतं. याच शोमध्ये प्रियांकाने आपल्या खाजगी आयुष्यातील आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे.
हॉलिवूड अभिनेता-गायक निक जोनससोबत लग्नानंतर न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली आहे. त्यामुळे सध्या ती आपल्या देशापासून दूर विदेशात आयुष्य जगत आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रियांका सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भारतीय चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. अभिनेत्री गेल्यावर्षी एका लेकीची आई बनली आहे. मात्र अभिनेत्रीने आपली मुलगी मालतीला सरोगेसीद्वारे जन्म दिला आहे.
(हे वाचा:Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने का सोडलं बॉलिवूड? 10 वर्षानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा )
दरम्यान प्रियांकाने आई होण्याबाबत आणि बाळाला जन्म देण्याबाबत पॉडकास्ट शोमध्ये संवाद साधला. यावेळी तिने आपल्या खाजगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केला आहे. प्रियांकाने हा खुलासा करत सांगितलं की, सध्या तिचं वय 40 आहे. आणि तिने वयाच्या तिसाव्या वर्षीच आपले एग्स फ्रिज केले होते. आपल्याला हा सल्ला एका खास व्यक्तीने दिल्याचंही तिने म्हटलं आहे.
याबाबत बोलताना प्रियांकाने सांगितलं की, 'मी खरच माझ्या तरुण मैत्रिनींना सांगू इच्छिते की, खरंच बायोलॉजिकल क्लॉक अस्तित्वात आहे. आणि त्यानुसार बऱ्याच तरुणींना वयाच्या पस्तिशीनंतर आई होणं फारच कठीण असतं. आणि ज्या तरुणी सतत काम करत असतात. त्यांच्याबाबतीत हे घडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या तरुणींनी आयुष्यात पैसे कमावून आणि साठवून आपले एग्ज फ्रिज करुन घ्यावे. जेणेकरुन या बायोलॉजिकल क्लॉकवर नियंत्रण ठेवता येऊ शकते'. असंही प्रियांका म्हणाली.
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'या प्रकियेमुळे त्यांचे एग्ज आहेत त्याच वयात राहतील.तसेच अभिनेत्रीने सांगितलं की, तिला हा महत्वाचा सल्ला तिची आई मधू चोप्रा यांनी दिला होता. फारच कमी लोकांना माहिती असेल की प्रियांका चोप्राची आई एक गायनॉकॉलिजस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Hollywood, Priyanka chopra