मुंबई, 28 मार्च- बॉलिवूडपासून ते हॉलिवूड पर्यंतचा टप्पा गाठणारे सेलिब्रिटी तसे कमीच आहेत. या यादीत अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव पहिल्या स्थानावर घेतलं जातं. कारण प्रियांका हॉलिवूडमध्ये सतत सक्रिय आहे. तिने ग्लोबल स्टार म्हणून ओळख मिळवली आहे. शिवाय अभिनेत्री विविध बहुचर्चित प्रकल्पांचा भागदेखील आहे. प्रियांकाला हॉलिवूडमध्ये चांगलं यश मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रियांका बॉलिवूडपासून दूर आहे. अभिनेत्रीचे चाहते तिला पुन्हा हिंदी सिनेमांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान प्रियांकाने बॉलिवूड सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने इतक्या वर्षांनंतर मनातील खंत व्यक्त केली आहे. ज्याबद्दल तिच्या सर्व चाहत्यांना आजपर्यंत काहीही माहिती नव्हतं. प्रियांकाच्या चाहत्यांना नेहमीच हे जाणून घ्यायचं असतं की, प्रियांकाने बॉलिवूडपासून दूर होत हॉलिवूडमध्ये सक्रिय होण्याचं कारण काय? प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. मग अचानक अभिनेत्रीने बॉलिवूड सोडत हॉलिवूडमध्ये करिअरचा निर्णय का घेतला अशी चर्चा नेहमीच सुरु असते. दरम्यान आता प्रियांका चोप्राने स्वतः या गोष्टीचा खुलासा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
प्रियांका चोप्राने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. अभिनेत्रीने ऐतिहासिकपासून ते मॉडर्न खलनायिकेपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहे. तिचा एक खास चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अफाट चाहते आहेत. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये 'फॅशन', 'सात खून माफ', 'कमीने', 'बर्फी', 'अंदाज' आणि 'ऐतराज' यांसारखे अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर, प्रियांका चोप्राने अचानक बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच चकित झाले होते. दरम्यान आता प्रियंकाला हॉलिवूडमध्ये सक्रिय होत जवळजवळ दहा वर्षे झाली आहेत. तब्बल 10 वर्षांनंतर प्रियांकाने बॉलिवूड सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. अभिनेत्रीच्या या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
प्रियांका चोप्राने सांगितलं की, 'बॉलिवूडमध्ये तिला हवं तसं काम मिळत मिळत होतं त्यामध्ये ती अजिबात खुश नव्हती. त्यामुळे ती बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. आणि या इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. यामागे आणखी एक धक्कादायक कारण होतं. अभिनेत्रीने याबाबत सांगितलं की, 'तेव्हा मला इंडस्ट्रीत (बॉलिवूड) एका कोपऱ्यात ढकललं जात होतं. लोक मला कास्ट करत नव्हते. मला त्या गोष्टीची अडचण होती. मी हा खेळ आणखी खेळू शकत नव्हते. कारण मी त्यातली खेळाडू नव्हते. आणि मी या इंडस्ट्रीतील राजकारणाला कंटाळले होते. मला या सगळ्यातून विश्रांतीची गरज होती. आणि मला जगाच्या दुसऱ्या बाजूला जाण्याची संधी मिळाली आणि मी ती घेतली.
कशी मिळाली हॉलिवूडमध्ये एन्ट्री?
प्रियांका चोप्राने पहिल्यांदाच बॉलिवूड टू हॉलिवूडच्या प्रवासाबाबत संवाद साधला आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, एकदा 'देसी हिट्स'च्या अंजली आचार्यांनी तिला एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहीलं, आणि त्यांनी अभिनेत्रीला फोन करुन तुला अमेरिकन म्युझिक इंडस्ट्रीत करिअर करण्यात रस आहे का? असा प्रश्न विचारला. हे सर्व अभिनेत्रीच्या 'सात खून माफ' सिनेमाच्याशूटिंग दरम्यान होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Hollywood, Priyanka chopra