मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'वयाच्या 15 व्या वर्षी झाला होता बलात्कार’; प्रियांका चोप्राच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

'वयाच्या 15 व्या वर्षी झाला होता बलात्कार’; प्रियांका चोप्राच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) मैत्रीण डेमी लवाटोवर (Demi Lavato) भयानक असा किस्सा सांगितला आहे.

बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) मैत्रीण डेमी लवाटोवर (Demi Lavato) भयानक असा किस्सा सांगितला आहे.

बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) मैत्रीण डेमी लवाटोवर (Demi Lavato) भयानक असा किस्सा सांगितला आहे.

न्यूयॉर्क, 17 मार्च: बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' (Unfinished) या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे. तिने या पुस्तकात तिच्या आयुष्यात घडलेल्या आणि सामान्य चाहत्यांना माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अशातच प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) यांची मैत्रीण डेमी लवाटोच्या जीवनावर अधारित एका (Demi Lovato: Dancing with the Devil) डॉक्युमेंट्रीचं चित्रीकरण (Documentary) करण्यात आलं आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये 28 वर्षीय डेमी लवाटोनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. डेमी लवाटो ही सध्या अमेरिकेची प्रसिद्ध गायिका आहे.

15 वर्षांची असताना आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती तिने आपल्या डॉक्युमेंट्रीमध्ये दिली आहे. ही डॉक्युमेंट्री पूर्णतः तिच्या जीवनावर अधारित असून एकूण चार भागात प्रदर्शित केली जाणार आहे. People Magazine च्या वृत्तानुसार, डेमीने आपल्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक घटना डॉक्युमेंट्रीच्या निमित्ताने चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. यामध्ये डेमीने 2008 सालच्या एका रात्री तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद घटनेचीही आठवण करून दिली आहे. डेमीनं सांगितलं की, 'तिला ड्रग्जचा ओव्हर डोस देण्यात आला होता आणि अशा अवस्थेतच तिच्यासोबत दुर्दैवी कृत्य करण्यात आलं होतं.'

हे वाचा - ‘कंगना जयललितांच्या भूमिकेत, मस्करी करताय का?’; राम गोपाल वर्मांचा टोला

डेमीचा एक मित्र Sirah Mitchell याने डॉक्युमेट्रीमध्ये त्या संबंधित ड्रग डिलरबद्दल सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, संबंधित ड्रग डिलरने डेमीला हेरोईन दिलं होतं. हे हेरोईन fentanyl ने भरलेलं होतं. ज्यामुळे तिची अक्षरशः शुद्ध हरपली होती. त्यानंतर त्याने तिला मरण्यासाठी तसंच सोडून दिलं होतं.

याबाबत डेमीनं सांगितलं की, 'मी नेकेड अवस्थेत पडली होती. त्याने माझा फायदा घेऊन मला मरण्यासाठी सोडून दिलं होतं. यानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला कळालं की, मी रुग्णालयात आहे. यावेळी डॉक्टरांनी विचारलं की, तू सहमतीनं शारिरीक संबंध ठेवला होता का? यावेळी माझ्या तोंडून - हो! असं उत्तर निघालं. यानंतर त्यांनी सांगितलं की, या ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्यानंतर किमान एक महिना तुम्ही त्या मानसिक अवस्थेत नसता, ज्यामुळे तुम्ही स्वतः एखादा निर्णय घेऊ शकाल.

हे वाचा - PHOTO: कोर्टानं सुनावली 3 वर्षांची शिक्षा; अभिनेत्री फिरतेय तुरुंगाबाहेर

ही दुर्दैवी घटना वयाच्या पंधराव्या वर्षी घडली होती.  त्यामुळे सर्व आयुष्यचं संपल्याचा अनुभव डेमीला आला होता. त्यानंतर पुढील काही महिने तिला या घटनेतून सावरता आलं नाही. ती आजही ते विसरू शकली नाही. या घटनेबद्दल माहिती देताना डेमी खूपच भावनिक झाल्याचं मत पिपल मॅगझिनमध्ये मांडण्यात आलं आहे.

First published:

Tags: Crime news, Drugs, Hollywood, International, Rape, Shocking news