मुंबई 17 मार्च: अभिनेता अली जफरवर (Ali Zafar) लैंगिक शोषणाचे (sexual harassment case) खोटे आरोप करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री, गायिका मिशा शफी (Pakistani Singer Meesha Shafi) हिला कोर्टानं तब्बल तीन वर्षांच्या कारावासीची शिक्षा सुनावली होती. परंतु असं असताना देखील मिशा अद्याप तुरुंगात गेलेली नाही. ती चक्क तुरुंगाबाहेर फिरताना दिसत आहे. उलट तिनं ट्रोल करणाऱ्यांवर टीका करत तुम्ही माझ्या स्वातंत्र्यावर जळताय का? असा रोखठोक सवाल केला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळं पाकिस्तानी कोर्टाच्या न्याय प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.
मिशानं इंन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती कुठल्याशा महागड्या गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. “हा पाहा माझा फोटो, कोण मुर्ख म्हणतंय मी तुरुंगात जातेय?” अशा आशयाची कॉमेंट तिनं या फोटोवर लिहिली आहे. त्यानंतर तिनं आणखी एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये तिनं ट्रोलर्सच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. “जर एखादी स्त्री तिच्यावर झालेल्या अन्यायाविषयी बोलली तर तुम्ही तिच्यावर टीका करता त्यामुळंच स्त्रिया होणारा अन्याय शांतपणे सहन करतात.” अशा आशयाचा टोला तिनं लगावला आहे.
अवश्य पाहा - ‘कंगना जयललितांच्या भूमिकेत, मस्करी करताय का?’; राम गोपाल वर्मांचा टोला
View this post on Instagram
प्रकरण काय आहे?
तीन वर्षांपूर्वी संपूर्ण मनोरंजनसृष्टी महिला कलाकारांनी सुरु केलेल्या #मीटू या चळवळीमुळं हादरली होती. या चळवळीचे पडसाद बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाले. अनेक अभिनेत्रींनी नामांकित निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. याच चळवळी दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री मिशा शफी हिनं अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानं काम देण्याच्या नावाखाली माझा लैंगिक छळ केला असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. या आरोपांविरोधात अलीनं कोर्टाचा दरवाजा ठोठावला. अन् कोर्टात अभिनेत्रीनं केलेले आरोप खोटे निघाले. परिणामी न्यायाधिशांनी दिला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. परंतु दोन दिवसानंतर मिशा तुरुंगाबाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळं या प्रकरणात नेमकं झाली तरी काय? पाकिस्तानमधील कुठल्या कायद्याअंतर्गत तिची शिक्षा कमी झाली? याबाबत जगभरातील लोक सवाल करत आहेत. दरम्यान या प्रकणामुळं पुन्हा एकदा पाकिस्तानी न्यायव्यवस्थेच्या प्रणालीवरच सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accusation, Actor, Crime, Entertainment, International, Pakistan, Sexual assault, Sexual harassment