मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Priyadarshan Jadhav: Timepass 3 ची स्क्रिप्ट फक्त 16 दिवसात कशी लिहिली? वाचा प्रियदर्शनचं उत्तर

Priyadarshan Jadhav: Timepass 3 ची स्क्रिप्ट फक्त 16 दिवसात कशी लिहिली? वाचा प्रियदर्शनचं उत्तर

प्रियदर्शन जाधव हा एक अभिनेता म्हणून उत्तम आहेच तशीच त्याची लेखनशैली सुद्धा अप्रतिम आहे. टाईमपास सारख्या गाजलेल्या सिनेमाच्या लेखनाची धुरा सांभाळताना त्याला आलेले अनुभव त्याने शेअर केले आहेत.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 19 जुलै: मराठी इंडस्ट्रीत एक अप्रतिम अभिनेता म्हणून नाव कमावलेला प्रियदर्शन जाधव सध्या एक महत्त्वाची जबाबदारी पेलताना दिसत आहे. अभिनयासोबत प्रियदर्शन हा उत्तम लेखक आहे हे सगळ्यांना माहित आहेच पण त्याच्या नव्या सिनेमाच्या लिखाणाची प्रोसेस काही (priyadarshan jadhav timepass 3 writing experience) अजबच होती असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

प्रियदर्शनने रवी जाधव यांच्या टाईमपास या सिनेमाच्या तिन्ही भागांचं लेखन केलं आहे. टाईमपास 2 मध्ये त्याने मोठ्या दगडूचं काम सुद्धा केलं होतं. रवी जाधव यांच्या या लोकप्रिय सिनेमा सिरीजचा तिसरा भाग लवकरच भेटीला येणार आहे. या कथानकाचं लेखन प्रियदर्शनने केवळ 16 दिवसात संपवल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

एका न्यूज पोर्टलशी बोलताना तो असं म्हणतो, “टाईमपास सारख्या सिनेमाचे तीन भाग लिहिणं सोपी गोष्ट अजिबात नव्हती. त्यात दोन भागांना मिळालेला प्रतिसाद बघून तिसरा भाग लिहिताना काहीसं दडपण सुद्धा होतं. पण तिसऱ्या भागाचं लिखाण अगदी पंधरा-सोळा दिवसात पूर्ण झालं. यामागे एक किस्सा आहे. मला काही सिक्वेन्सने सीन सुचत नाहीत ते जसे सुचतात तसे मी लिहितो आणि नंतर त्यांची जोडणी करतो. आधीच्या दोन भागांमध्ये मी अनेक सीन रीराइट केले आहेत. पण त्यावेळी मी स्वतःसाठी एक लिखाणाचा एक्सरसाईज करायचो ज्यात मी सिनेमातील पात्रांना घेऊन वेगवेगळ्या माझे माझे सीन तयार करायचो.

हे ही वाचा- Hemangi Kavi : रेडिओ आणि न्यूजपेपरमध्ये फरक काय?; 'तमाशा live' फेम अभिनेत्रीचं उत्तर ऐकून हैराण व्हाल

वेगवेगळ्या सिचुएशन बनवायचो. आणि त्यातला एकही सीन खऱ्या सिनेमात वापरलेला नाही. ते मी मला कळण्यासाठी करत होतो आणि त्याचा उपयोग मला तिसऱ्या भागाचं लिखाण करताना झाला. पालवी आणि तिच्या बाबांचे सीन्स लिहिताना काहीसा कस लागला पण त्यामुळे तिसऱ्या भागाचं लिखाण लवकर पूर्ण झालं. कारण माझ्याकडे अभ्यास बऱ्यापैकी तयार होता.”

" isDesktop="true" id="734647" >

प्रियदर्शन वर्क फ्रंटवर सध्या एक नवं नाटक करताना दिसत आहे. त्याच्या प्रत्येक कलाकृतीला आजपर्यंत नावाजण्यात आलं आहे तसंच चाहत्यांनी सुद्धा त्याच्यावर भरभरून प्रेम केलं आहे. त्याने लिहिलेल्या या टाईमपासचा तिसरा भाग पाहायला प्रेक्षक आतुर झाले आहेत.

First published:

Tags: Marathi entertainment, Time pass marathi movie