मुंबई,27 जुलै- मराठीतील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत होय. हे दोघेही सतत एकमेकांसोबत माजमस्ती करताना, रोमॅंटिक होताना दिसून येतात. या दोघांचं नातं चाहत्यांना फारच पसंत पडतं. तसेच हे पती-पत्नी सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतात. आपल्या प्रत्येक पोस्टमधून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. आजही असंच काहीसं झालं आहे. प्रिया आणि उमेश पती-पत्नी कमी आणि एकेमकांचे खास मित्र जास्त वाटतात. त्यांचं हे बॉन्डिंग प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडतं. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. प्रिया आणि उमेश सतत एकमेकांसोबतचे रोमँटिक आणि सुंदर फोटो शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची भरभरून पसंती मिळत असते. नुकतंच प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती उमेशसोबतच आपला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघेही चहाचा ग्लास घेऊन रस्त्याकडेला बसलेले दिसून येत आहेत. फोटोमध्ये प्रिया विचारमग्न दिसत आहे. तर उमेश स्माईल देताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने हा फोटो कोणत्या शोमधील आणि कोणत्या एपिसोडमधील आहे? हे ओळखण्याचं चॅलेंज चाहत्यांना दिलं आहे.
**(हे वाचा:** Thipkyanchi Rangoli: अखेर अपूर्वा कानिटकरांच्या घरी परतणार; अप्पू शशांकचे रोमँटिक PHOTO आले समोर ) वास्तविक हा फोटो प्रिया आणि उमेशच्या ‘आणि काय हवं सीजन 3’मधील आहे. ही एक प्रचंड लोकप्रिय मराठी वेबसीरिज आहे. या सीरिजला तरुणाईंची विशेष पसंती मिळाली आहे. यामध्ये प्रिया आणि उमेशने गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि नंतर पती-पत्नी बनणाऱ्या कपलची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्यांनी नात्याच्या विविध बाजू मांडल्या आहेत. नेटकऱ्यांनी हा फोटो अचूक ओळखत या शोमधील तिसऱ्या सीजनच्या शेवटच्या एपिसोडमधील हा सीन असल्याचं सांगितलं आहे. सध्या हा फोटो प्रचंड पसंत केला जात आहे.