मुंबई, 15 फेब्रुवारी- नुकतंच काल व्हॅलेंटाइन्स डे पार पडला. सर्वसामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वच लोक प्रेमात बुडालेले दिसून आले. तसेच काही लोकांनी पहिल्यांदाच समोर येत जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. दरम्यान क्रिकेटर पृथ्वी शॉसुद्धा प्रचंड चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉ सीआयडी या लोकप्रिय शोमधील अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही माहिती समोर येताच सर्वच चकित झाले आहेत. पृथ्वी शॉने आता आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ मॉडेल आणि सीआयडी मालिकेतील अभिनेत्री निधी तापडियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे असं वृत्त सोशल मीडियावर समोर आलं आहे. वृत्त समोर येताच हा क्रिकेटर आणि अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यादरम्यान 'सीआयडी' अभिनेत्रीसोबत भारतीय क्रिकेटरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
(हे वाचा:Prateik Babbar: स्मिता पाटील यांचा मुलगा पुन्हा प्रेमात; कोण आहे राज बब्बरांची होणारी सून? )
सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, 'हॅप्पी व्हॅलेंटाइन डे बायको.' पोस्टमध्ये हार्ट आणि किसिंग इमोजीही शेअर केल्या आहेत. ही पोस्ट पाहून असं लक्षात येत आहे की, ती पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. दरम्यान 'सीआयडी' फेम या अभिनेत्रीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इन्स्टाग्रामवर सेल्फ लव्हबद्दलची एक नोट शेअर केल्यावर ही पोस्ट जोरदार चर्चेत आली. 'पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करा' असं लिहिलेली ही पोस्ट आता इंस्टाग्राम स्टोरीमधून हटवण्यात आली आहे. लोकांनी ती पोस्ट डिलीट करण्यापूर्वीच त्याचे स्क्रीनशॉट्स घेतले आहेत. जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परंतु आता हे सर्व प्रकरण वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रकरणावर पडदा टाकत आता पृथ्वी शॉने इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांसाठी एक मेसेज लिहिला आहे. आपण असा कोणताही फोटो अपलोड केला नसल्याचं स्पष्टीकरण या क्रिकेटपटूने दिलं आहे.
पृथ्वीने लिहलंय, 'कोणीतरी माझा फोटो एडिट केला आहे. आणि मी माझ्या सोशल मीडिया पेजवर किंवा इंस्टाग्राम स्टोरीवर असा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. त्यामुळे सर्व मेसेज आणि टॅगकडे दुर्लक्ष करा. धन्यवाद.'
पृथ्वी शॉ आणि निधीचा व्हायरल झालेला फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हायरल फोटो या दोघांच्या लग्नाकडे इशारा करत आहे. तथापि, अनेक लोक याला क्रिकेटरचा अपमान म्हणत आहेत. कारण रुमर्ड गर्लफ्रेंडने त्याच्यासोबत असे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. पृथ्वी शॉ गेल्या महिन्यातच टीम इंडियामध्ये परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याला घेण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Entertainment, Prithvi Shaw, Tv actress