सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा म्हणजे अभिनेता प्रतीक बब्बर होय.
प्रतीक बब्बर नेहमीच आपल्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखला जातो. तो नेहमीच बिधास्तपणे आपलं आयुष्य जगत असतो.
प्रतीक बब्बर अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. प्रिया ऐश्वर्या रायसोबत 'जजबा' चित्रपटात झळकली होती. या दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. नंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आहे.
प्रतीक बब्बरने याआधी आपल्या मैत्रिणीसोबतच लग्न केलं होतं. परंतु अवघ्या एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला होता.