मुंबई, 25 डिसेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) सध्या तिच्या 'मधुबन' (Madhuban Song) या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. सनी लिओनीचं हे गाणं (Sunny Leone Song) रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. व्हिडिओमध्ये सनी लिओनीचा डान्स पाहून लोक नाराजी व्यक्त करत आहेत. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे संतांनी सनी लिओनीच्या या नवीन व्हिडिओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संतांनी सनी लिओनीवर तिच्या नृत्याला 'अश्लील' म्हणत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
नुकतंच सनी लिओनीचं नवीन गाणं 'मधुबन' रिलीज झालं आहे. कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी हे गाणं गायिलं आहे. सनीने या गाण्याचं जोरदार प्रमोशनही केलं आहे. परंतु आता हे गाणं वादात सापडल्याचं दिसत आहे. या गाण्यावर आक्षेप घेत वृंदावनचे संत नवल गिरी महाराज म्हणतात की, या गाण्यावर बंदी घातली पाहिजे.
संत नवल गिरी महाराज यांनी पीटीआयशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. आणि म्हटलं आहे की, 'सरकारने अभिनेत्रीवर कारवाई करून तिच्या व्हिडिओ अल्बमवर बंदी घातली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ.' ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत ती व्हिडिओ मागे घेत नाही आणि जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत सनी लिओनीला भारतात राहण्याची परवानगी देऊ नये'. त्याचवेळी, अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी म्हटलं आहे की, 'सनी लिओनीने 'अपमानास्पद' पद्धतीनं गाणं सादर करून ब्रिजभूमीच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे'.
(हे वाचा:HBD: रकुल प्रीतआधी भूमि पेडणेकरच्या प्रेमात होता जॅकी भगनानी )
सनी लिओनीचं 'मधुबन' हे गाणं सारेगामा म्युझिकच्या यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. हे एक 'पार्टी सॉन्ग' आहे. हे गाणं सनी लिओनीवर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं मोहम्मद रफी यांच्या 1960 मध्ये आलेल्या 'कोहिनूर' चित्रपटातील 'मधुबन में राधिका नाचे' या गाण्यावर आधारित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.