मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Preity Zinta: प्रितीनं अमेरिकेत अशी साजरी केली गोकुळाष्टमी; पतीसोबत कृष्णाच्या भक्तीत रमली अभिनेत्री

Preity Zinta: प्रितीनं अमेरिकेत अशी साजरी केली गोकुळाष्टमी; पतीसोबत कृष्णाच्या भक्तीत रमली अभिनेत्री

बॉलिवूडची सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री अशी प्रिती झिंटाची ओळख आहे.तसेच 'डिंपल गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिती सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 ऑगस्ट-   बॉलिवूडची सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री अशी प्रिती झिंटाची ओळख आहे.तसेच 'डिंपल गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिती सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेक नवनवीन व्हिडिओ शेअर करून ती तिच्या चाहत्यांना अपडेट करत असते. प्रितीनं नुकतंच जन्माष्टमीच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या अभिनेत्री अमेरिकेत आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

फक्त देशातच नव्हे तर जगभरात कृष्ण जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला. कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करताना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान प्रितीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अमेरिकेत कृष्णाची पूजा कशी होते हे सांगितलं आहे. विदेशात राहूनही अभिनेत्री आपली संस्कृती जपत असल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.

प्रिती झिंटानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री डोक्यावर ओढणी घेऊन बसलेली दिसत आहे. प्रितीनं यामध्ये पिवळा चुडीदार परिधान केला आहे. या पारंपरिक लुकमध्ये प्रिती नेहमीप्रमाणेच फारच सुंदर दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीचं मनमोहक हास्य अनेकांना आजही घायाळ करत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आपला पती जीन गुडइनफसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे जीनसुद्धा प्रितीसोबत कृष्णाची पूजा करताना दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

(हे वाचा:दीपिका-रणवीरचा थाटामाटात गृहप्रवेश; समोर आली नव्या अलिशान घराची पहिली झलक )

प्रितीनं व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, 'जय श्री कृष्ण. सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. घाटी मंदिराला भेट देणं आणि जन्माष्टमी उत्सवात सहभागी होणं खूप छान अनुभव होता. प्रितीच्या या व्हिडीओमध्ये 'श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी' हे भक्तिगीत ऐकायला मिळत आहे. चाहते प्रितीचं कौतुक करत आहेत आणि जय श्री कृष्ण म्हणत तिचं अभिनंदन करत आहेत. तसेच प्रितीच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफने 29 फेब्रुवारी 2016 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केलं होतं. 2021 मध्ये, हे दोघे सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे आईबाबा बनले आहेत. सध्या प्रिती पडद्यापासून दूर आपलं खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Preity zinta, Shri krishna janmashtami