
महाराष्ट्राची लाडकी गायिका आणि अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकरची ओळख आहे. यासोबतच आपल्या सौंदर्यानेही तिने चाहत्यांवर जणू मोहीनीच टाकली आहे. पाहा आर्याचे मनमोहक फोटो.

तब्बल १३ वर्षांपूर्वी आर्याही सा रे ग म प लिटील चॅम्प्सच्या पहिल्या पर्वात झळकली होती. टॉप पाच स्पर्धकांमध्ये आर्याने बाजी मारली होती. हे नवं सांगायला नको. तर आता याच कार्यक्रमात ती बालगायकांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.

पण आर्याने तिच्या गोड गळ्यासोबतच सौंदर्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आर्याने तिच्या चाहत्यांचे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आभार मानले आहेत. ती लिहिते, 'तुम्ही सगळयांनी गेले 2 दिवस माझ्यावर आणि सारेगमप लिटिल चॅम्पस् ह्या कार्यक्रमावर जो प्रेमाचा वर्षाव केलायत त्यानी मी इतकी भारावून गेलेय की शब्दात वर्णन करता येत नाहीये'

पुढे ती लिहिते की, 'मला tag केलेल्या stories, posts, comments, memes मी बघितल्या/वाचल्या आहेत..आणि जमेल तितक्या stories reshare सुध्दा केल्या आहेत..असंच तुमचं प्रेम आणि rock solid support माझ्या पाठीशी कायम असुदेत, हीच विनंती…'

त्यातील तिची तन्वीची व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली होती. अभिनय बेर्डे सोबत तन्वीची केमिस्ट्री हिट ठरली होती.




