मुंबई 26 जून: टाईमपास (Timepass marathi movie) चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा अभिनेता मिळाला. त्याचा एकदम हटके अंदाज आजही पाहण्यासारखा असतो. अनेक छोट्यामोठ्या भूमिकेनंतर त्याला अखेर आता मानसारखं यश मिळायला लागलं आहे. यशासोबत आता तो एका वेगळ्या रुबाबात असतो असं एका नव्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. ‘हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ असं म्हणत दगडू या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला. त्याआधी सुद्धा बालक पालक (Balak Palak) सिनेमातून तो एका रफ अँड टफ भूमिकेत दिसला होता. पण टाईमपास मधला त्याचा टपोरी पण प्रेमळ अंदाज प्रेक्षकांना भावला. सध्या (Prathamesh Parab Instagram) प्रथमेश सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह असतो. त्याच्या नव्या विडोबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. आता एक चर्चित स्टार झाल्यावर प्रतिमेस नेमका कशा अवतारात वावरतो याची उत्सुकता अनेकांना आहे. या व्हिडिओमध्ये प्रथमेश नेमका व्हॅनिटी मध्ये कसा चालत येतो हे चाहत्यांना पाहायला मिळत आहे. त्याच्या चालण्याची नक्कल त्याच्या मेकअपमन दादांनी करून दाखवली आहे. तो कशा अंदाजात मेकअप करायला बसतो हे पाहून हसू आवरण अनेकांना कठीण झालं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे मेकअपमन संतोष प्रथमेशची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे. मानेची एक विशिष्ट हालचाल करत येणारा प्रथमेश खुर्चीत येऊन एक पाय वर करून टेचात बसतो हे त्यांनी विनोदी ढंगात दाखवलं आहे. ते पाहून प्रथमेशच्या अनेक ओळखीच्या मंडळींनी कमेंट सेक्शनमध्ये त्याला दुजोरा देत या व्हिडिओची मजा घेतली आहे. तसंच अनेक चाहत्यांना सुद्धा त्याचं हे unseen रूप पाहायला मिळाल्याने धमाल आली आहे. प्रथमेश येत्या काळात दृश्यम चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. तसंच त्याचा हिट पिक्चर टाईमपासच्या तिसऱ्या भागात आणि टकाटक चित्रपटाच्याही सिक्वेलमधून तो भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.