मुंबई, 12 नोव्हेंबर : मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतो. सध्या तो 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत काम करत आहे. आज संकर्षण कऱ्हाडेचा वाढदिवस असून त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सगळेजण संकर्षणसाठी काहीना काही खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अशातच 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं वाढदिवसाचं औचित्य साधत संकर्षणासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं तिच्या इन्स्टाग्रामवर संकर्षणसोबतचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने दोघांचा खातानाचा फोटो शेअर केला असून फोटोसोबत एक लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शन लिहित प्रार्थना म्हणाली, 'आठवतंय का...दोन मित्र एकाच ताटात खाणार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिअर संकर्षण कऱ्हाडे.'
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील सर्वांचा आवडता समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. विविध पोस्ट शेअर करत तो चाहत्यांसोबत कनेक्ट राहतो. तो त्याचे अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करतो. आज तर चाहते त्याच्यावर खूप सारं प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
दरम्यान, संकर्षण अनेक मालिका, नाटक, रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. सध्या तो झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे एकत्र दिसत आहेत. मालिकेत नेहा कामतची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहेरे साकारते आहे तर श्रेयश तळपदे यशची भूमिका साकारत आहे. या मालिकेत संकर्षण यशचा मित्र समीरची भूमिका साकारतान दिसत आहे. या मालिकेतील बालकलाकार परी म्हणजेच मायरा वैकुळही खूप चर्चेत असते. अशातच या मालिकेत नवा ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळत आहे. त्यामुळे मालिका सध्या एक रंजक वळणार आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Marathi news, Prarthana Behere, Zee marathi serial