Home /News /entertainment /

Prarthana Behere: 'पुढच्या जन्मी प्रार्थना फक्त माझीच' नवऱ्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टवर फॅनची कमेंट चर्चेत

Prarthana Behere: 'पुढच्या जन्मी प्रार्थना फक्त माझीच' नवऱ्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टवर फॅनची कमेंट चर्चेत

छोट्या पडद्यावर नेहा कामतच्या रूपात दिसणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने स्वतःच्या रियल लाईफ नवऱ्यासाठी एक अप्रतिम पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या लक्षवेधी ठरत आहे.

  मुंबई 2 जुलै: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावर एका चांगल्या भूमिकेत दिसत असल्याने तिचं फॅन फॉलोईंग कमालीचं वाढलेलं दिसत आहे. प्रार्थनाने आज तिच्या नवऱ्याबद्दल एक खास पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. एकदम क्रेझी अंदाजात शेअर केलेली ही पोस्ट सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्रार्थनाने (Prarthana Behere husband) अभिषेक जावकरसोबत 2017 मध्ये विवाह केला होता. त्यांचं हे लग्न बरंच चर्चेत सुद्धा आलं होतं. आज प्रार्थना आणि अभिषेकासाठी खास दिवस आहे. कारण पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रार्थना आणि अभिषेक यांची भेट झाली होती. यानिमित्ताने एक पोस्ट शेअर (Prarthana Behere romantic post for husband) करत प्रार्थनाने एक क्रेझी रील शेअर केलं आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एक फिल्टर फेमस होत आहे ज्यात शरीर असं विचित्र आणि विनोदी पद्धतीने हलताना दिसतं. त्यावर बरेच रीलसुद्धा येत आहेत. याच रीलचा वापर करत प्रार्थनाने अभिषेकसोबतचा विडिओ शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत ती असं म्हणते, “ तू होगा जरा पागल तुने मुझको है चुना… पाच वर्ष झाली आपल्याला पहिल्यांदा भेटून आणि rest is history”. प्रार्थनाची ही जब वी मेट स्टोरी गाजताना दिसत आहे.
  (Prarthana Behere fans) त्याहून जास्त लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे एका युजरने प्रार्थनाच्या पोस्टखाली केलेली कमेंट. एक युजर असं म्हणतो, “या जन्मात प्रार्थना अभिषेकची आहे, पण पुढच्या जन्मात फक्त माझीच होणार. तोच सेम लुक, तोच चेहरे, तेच बोलके आणि मोहक डोळे घेऊन ती माझ्या आयुष्यात येणार. लव्ह यु प्रार्थना” प्रार्थनाच्या या फॅनने कमेंट करून अनेक चाहत्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे. हे ही वाचा- Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमची धमाल ट्रिप; 5 जुलैला होणार नव्या सिझनचा श्रीगणेशा!
   प्रार्थनाच्या लुकचे, तिच्या भावसौंदर्याचे, मोहक डोळ्यांचे हजारो चाहते आहेत. आणि प्रार्थना कायमच आपल्या चाहत्यांची आवडती राहिली आहे. तिने सुद्धा या कमेंटची दखल घेऊन चाहत्याला रिप्लाय केला आहे.
  प्रार्थना सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये एका चांगल्या रोलमध्ये दिसत आहे. या मालिकेने सध्या चांगला ट्रॅक पकडला आहे. येणारं वर्ष तरी ती छोटा पडदा एकदम दणाणून सोडणार यात काही शंका नाही.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Prarthana Behere, Romantic day, Wife and husband, Zee Marathi

  पुढील बातम्या