जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Prarthana Behere: नेहा-यशला पडली 'या' सुपरहिट मालिकेच्या शीर्षकगीताची भुरळ; व्हिडिओ होतोय VIRAL

Prarthana Behere: नेहा-यशला पडली 'या' सुपरहिट मालिकेच्या शीर्षकगीताची भुरळ; व्हिडिओ होतोय VIRAL

Prarthana Behere: नेहा-यशला पडली 'या' सुपरहिट मालिकेच्या शीर्षकगीताची भुरळ; व्हिडिओ होतोय VIRAL

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश आणि नेहा या कलाकारांना सध्या झी मराठीच्याच एका जुन्या मालिकेचं शीर्षकगीत भुरळ पाडताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 08 ऑगस्ट: झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या उत्साहवर्धक ट्रॅक सुरु आहे. एकीकडे अविनाशच्या येण्याने परीची तब्येत सुधारताना दिसत आहे तर दुसरीकडे मालिकेत लवकरच मंगळागौरीचा ट्रॅक सुद्धा सुरु होताना दिसणार आहे. अशातच प्रार्थना बेहरेने एक खास व्हिडिओ शेअर करत श्रेयस तळपदेसोबतच्या काही bts मोमेंट्स शेअर केल्या आहेत. यामध्ये यश आणि नेहा (majhi tujhi reshimgath yash and neha) यांच्यातले गोड क्षण तर दिसत आहेतच पण व्हिडिओसाठी वापरलेलं गाणं सुद्धा अगदी खास आहे. प्रार्थनाने झी मराठीवरील सुपरहिट मालिका ‘वादळवाट’ मालिकेचं शीर्षकगीत ‘थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले’ वापरून एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यातूनच यश आणि नेहाला सुद्धा मालिकेच्या टायटल सॉंगची भलतीच भुरळ पडल्याचं दिसत आहे. वादळवाट मालिका संपून आज अनेकवर्ष झाली तरी या मालिकेची क्रेझ टिकून आहे. सगळ्यांनाच या मालिकेचं कथानक आणि यातील पात्र जशीच्या तशी लक्षात आहेत. या मालिकेच्या टायटल सॉंगचा विशेष चाहतावर्ग आहे. आता यामध्ये प्रार्थनाचं नाव सुद्धा जोडलं पाहिजे.

हे ही वाचा-  Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीला अभिनयात नव्हता रस; ‘या’ कारणामुळे बनली अभिनेत्री या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “कारण हे गाणं माझ्या आवडीचं आहे.” या गाण्याच्या धर्तीवर यश आणि नेहामधील काही गोड क्षण बघायला मिळत आहेत. नेहा अगदी पारंपरिक वेशात सजली असून तिच्या मंगळागौरीच्या दरम्यान तिचे यशासोबत असलेले काही रोमँटिक क्षण यामध्ये दिसत आहेत.

जाहिरात

मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक मध्ये प्राची तब्येत बरीच बिघडलेली दिसत होती आणि ती झोपेत ड्रायव्हर काकांची आठवण काढताना दिसत होती. त्यानंतर निघून गेलेल्या अविनाश उर्फ ड्रायव्हर काकांना यश शोधून आणताना सुद्धा बघायला मिळालं होतं.

परीच्या हळूहळू जवळ येण्याचा अविनाशचा प्रयत्न सफल होताना दिसत आहे. त्याची नेमकी खेळी काय आहे हे समोर आलेलं नाही पण सध्या मालिकेचा ट्रॅक प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात