मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कोरोनाग्रस्तांची मदत करायचीय? तर मग या उपक्रमात द्या प्रार्थना बेहरेची साथ

कोरोनाग्रस्तांची मदत करायचीय? तर मग या उपक्रमात द्या प्रार्थना बेहरेची साथ

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिनं देखील मदतीचा हात पुढे केला आहे. तिनं स्वत: काढलेली काही चित्र विकून त्यामधून मिळालेल्या पैशांद्वारे गरजुंची मदत करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. (How to help corona victims)

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 24 मे: कोरोना रुग्णांचा (coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढला आहे. रुग्णालयात बेड, औषधं, ऑक्सिजन, लसी यांचा तुटवडा जाणवत आहे. शिवाय बेरोजगारीमुळं अनेकांना रुग्णालयात जाऊन उपचार घेणं देखील परवडत नाहीये. अशा प्रतिकूल परिस्थितीत इतर मराठी कलाकारांसोबतच अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिनं देखील मदतीचा हात पुढे केला आहे. तिनं स्वत: काढलेली काही चित्र विकून त्यामधून मिळालेल्या पैशांद्वारे गरजुंची मदत करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. (How to help corona victims)

प्रार्थनानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. "कोरोना'च्या सध्याच्या अवताराने जगात धुमाकूळ घातलाय, हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. कोरोनामुळे अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागतय, आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप हाल सोसावे लागतायेत ...”

‘मराठी संस्कृतीची इज्जत घालवणं थांबवा’; आशय कुलकर्णीच्या त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

“अशावेळी मी त्यांच्या साठी काय करू शकते हा विचार नेहमी माझा मनात यायचा? लॉकडाउनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरवात केली आणि त्याच वेळी मला माझ्या मैत्रिण @rjsmee कडून या चित्रांना विकून, त्या रकमेतून गरजू लोकांना मदत करण्याची कल्पना सुचली. स्वतःचं आर्ट विकायला कोणालाच आवडत नाही पण मी हे पेंटिंग पैसे कमावण्यासाठी विकत नसून यामधून मिळणारी सर्व रक्कम समाज कार्यासाठी वापरायचे ठरवले आहे. माझ्याकडून एक मदत म्हणून मी हा उपक्रम राबवत आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत हवी आहे.”

“हे पेंटिंग विकायला आहेत म्हणून घेऊ नका, तर ते पैसे तुम्ही समाज कार्यासाठी दान करत आहेत अशी भावना ठेवा आणि त्या बद्दल माझ्या कडून हे पेंटिंग रिटर्न गिफ्ट आहेत असे समजा. जे लोकं पेंटिंग विकत घेतील त्या सर्वांना लॉकडाउन संपल्यावर कुरिअरनी ते घरपोच पाठवले जातील व मी स्वतः त्यांना संपर्क करेन.” अशी पोस्ट लिहून तिनं ही चित्र विकत घेण्याचं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Entertainment, Prarthana Behere