मुंबई 3 मार्च: पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारानुसार इंधनाचे दर दररोज बदलत असतात. गेल्या काही काळात इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. मध्यप्रदेशात पेट्रोलच्या किंमतीनं शंभरी पार केली. राजधानी भोपाळमध्ये तर 100 रुपये 4 पैसे प्रती लिटर हा पेट्रोलचा दर आहे. (Petrol Disel Price Hikes) त्यामुळं सर्वसामान्य जनता सध्या इंधनाच्या वाढत्या दरामुळं त्रस्त आहे. या वाढत्या दरांवरुन अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सरकारला लाज वाटायला हवी’ अशी सडकून टीका त्यांनी केली आहे.
this is too CRUEL on citizens. SHAME ON this government #justasking pic.twitter.com/mQxwouUMf7
— Prakash Raj (@prakashraaj) March 2, 2021
प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी जीवनावश्यक गोष्टींची वाढ कशा प्रकारे होत गेली याची माहिती दिली. शिवाय सरकारच्या धोरणांवर टीका देखील केली आहे. “गेल्या तीन महिन्यांत गॅसची किंमत 225 रुपये प्रती सिलेंडर झाली आहे.” अशा आशयाचं ट्विट करत सरकारला लाज वाटायला हवी सर्वसामान्यांचं शोषण करताना असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
It is those times ....when the ones whom you adored playing a BALL game.. continue to play without them too .. #FarmersProtest #IStandWithFarmers #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) February 5, 2021
अवश्य पाहा - पेट्रोलच्या दरानं गाठलं शतक; संतापलेल्या रिचानं साधला मोदी समर्थकांवर निशाणा पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल डिझेलचे रोजचे दर एसएमएसच्या माध्यमातूनही जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑइल कंपनीचे ग्राहक आरएसपी (RSP) आणि आपल्या शहराचा पिनकोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक आरएसपी (RSP) हा मेसेज या नंबरवर 9223112222 आणि एचपीसीएलचे (HPCL) ग्राहक एचपी प्राईस (HP Price)असा संदेश 9222201122 या क्रमांकावर पाठवून एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर जाणून घेऊ शकतात.