मुंबई, 17 जुलै- ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रचंड चर्चेत आली होती. या वेबसीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. प्राजक्ता आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच कनेक्ट असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या अपडेट्स चाहत्यांना देत असते. नुकतंच प्राजक्ताने एक नवी पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट प्रचंड पसंत केली जात आहे. ही पोस्ट शेअर करत, प्राजक्ताने ‘मी एकटीच का?…. तुम्हीही आनंद घ्या’. असं कॅप्शनसुद्धा दिलं आहे. तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल. ही पोस्ट नेमकी काय आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो. प्राजक्ताने शेअर केली हि पोस्ट फारच मजेशीर आहे.
(हे वाचा: Adish Vaidya: ‘सर्वकाही मागे टाकत सुरुवातीपासून सुरुवात करणं…’, आदिश वैद्यची पोस्ट चर्चेत ) प्राजक्ताने आपल्यावर बनवण्यात आलेले मजेशीर मेम्स शेअर केले आहेत. यामध्ये नेटकऱ्यांनी मजेशीर असे विविध सन्दर्भ देत मेम्स बनवले आहेत. आजकाल मेम्सचा जणू पाऊसचं पडत आहे. सध्या सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर मेम्स बनत असतात. चांगली असो किंवा वाईट प्रत्येक गोष्ट आज मेम्स माध्यमातून समोर आणली जाते. मात्र प्राजक्तावर बनलेले हे मेम्स फारच मजेशीर आहेत. प्राजक्ता स्वतः तर याचा आनंद घेतच आहे. शिवाय चाहत्यांसोबतसुद्धा आनंद शेअर करत आहे.