दिल से (Dil Se) : शाहरुख खानच्या लोकांना सर्वात आवडलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'दिल से', ज्यामध्ये प्रीती झिंटा फ्रेश चेहरा होती. ही भूमिका सर्वप्रथम राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आली होती. परंतु, तिला ही भूमिका दमदार वाटली नाही. (फोटो क्रेडिट्स: Film Poster)
लगान (Lagaan) : भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणाऱ्या 'लगान' चित्रपटातील आमिर खान, ग्रेसी सिंग आणि इतर पात्रांना चांगलीच पसंती मिळाली. ग्रेसी सिंगचं पात्र सर्वप्रथम राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आलं होतं. (फोटो क्रेडिट्स: Film Poster)
मुन्ना भाई एमबीबीएस (Munna Bhai MBBS) : राणी मुखर्जीने 'मुन्ना भाई एमबीबीएस' सारख्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर ऑफर नाकारली. ती नंतर ग्रेसी सिंगकडे गेली. (फोटो क्रेडिट्स: Film Poster)
द नेमसेक (The Namesake) : राणी मुखर्जीने दिवंगत इरफान खानची भूमिका असलेल्या 'द नेमसेक' चित्रपटातील भूमिका नाकारली होती. नंतर तब्बूने हे पात्र साकारलं. (फोटो क्रेडिट्स: Film Poster)
भूलभुलैया (Bhool Bhulaiyaa) : 'भूल भुलैया' या चित्रपटातील विद्या बालनने साकारलेल्या 'मंजुलिका' या भूमिकेने आज सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. ही भूमिका आधी राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आली होती. (फोटो क्रेडिट्स: Film Poster)
गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'साठी राणी मुखर्जी ही संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती होती, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, राणीने या भूमिकेला 'नकार' दिला. (फोटो क्रेडिट्स: Film Poster)