मराठमोळी युट्युबर प्राजक्ता कोळी अर्थात तिच्या डमडम च्या लाडक्या Mostlysane चा आज 29 वा वाढदिवस आहे.
तिच्या एवढ्या मोठ्या प्रवासातल्या काही achievements बद्दल जाणून घेऊया
मुळात RJ व्हायचं स्वप्न असणाऱ्या प्राजक्ताने rj झाल्यावर काहीच महिन्यात जॉब सोडून युट्युब जॉईन केलं. आज ती 6 वर्षाहून जास्त काळ यशस्वी युट्युबर म्हणून कॉन्टेन्ट बनवत आहे.
युट्युबरचा प्रवास तिच्यासाठी सोपा सहज नव्हता. ज्या वेळेला ती युट्युब सोडायचा विचार करत होती तेव्हाच तिचे व्हिडिओ पसंत केले जाऊ लागले आणि ती प्रसिद्ध झाली.
नुसतंच कॉमेडी नाही तर बॉडी शेमीन्ग, इंटरनेट ट्रोलिंग यासारखा विषयावर तिने काही खास गाणी सुद्धा बनवली जी तुफान प्रसिद्ध आहेत.
याच विडिओचं स्क्रीननिंग UN मध्ये सुद्धा झालं आणि तिला भारत देशाचं United Nations मध्ये नेतृत्व करायला मिळालं.
याशिवाय तिला अनेक मोठमोठ्या व्यक्तींना भेटायचा मान मिळाला आहे. मिशेल ओबामा, सद्गुरू अशा लोकांशी संवाद साधायची संधी तिला मिळाली आहे.
प्राजक्ताने युट्युबसोबत हळूहळू बॉलिवूडकडे सुद्धा आपली वाट वळवली.
मिसमॅच या अफलातून सीरीजमुळे तिचं ott वर पदार्पण झालं
नुकत्याच आलेल्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटात सुद्धा तिची महत्त्वाची भूमिका आहे.
प्रत्येक फॅनच म्हणणं ऐकणारी,अगदी त्यांना घरच्यासारखी वागणूक देणारी प्राजक्ता तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. तिचे 300 हुन अधिक फॅनपेज आहेत.
प्राजक्ताचे दिलखुलास, मनमोकळे विडिओ आठवड्याच्या तीन दिवशी तीन वेगवेगळ्या ढंगाचे विडिओ चाहत्यांना खूप जास्त आवडतात.
स्वतःच्या हिमतीवर एक वेगळी करिअर वाट निवडत प्राजक्ता आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. ती अनेक तरुण तरुणींसाठी इन्स्पिरेशन आहे.