मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /The kashmir Files ठरला प्रभासच्या Radhe Shyam ला वरचढ? पाहा Box Office Collection

The kashmir Files ठरला प्रभासच्या Radhe Shyam ला वरचढ? पाहा Box Office Collection

 'राधे श्याम'  (Radhe Shyam)  आणि 'द काश्मीर फाइल्स'  (The Kashmir Files)   हे दोन चित्रपट 11 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती.

'राधे श्याम' (Radhe Shyam) आणि 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हे दोन चित्रपट 11 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती.

'राधे श्याम' (Radhe Shyam) आणि 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हे दोन चित्रपट 11 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती.

मुंबई, 12 मार्च-   'राधे श्याम'  (Radhe Shyam)  आणि 'द काश्मीर फाइल्स'  (The Kashmir Files)   हे दोन चित्रपट 11 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. एकीकडे बाहुबली स्टार प्रभास   (Prabhas)  आणि पूजा हेगडे   (Pooja Hegade)  यांचा 'राधे श्याम' हा चित्रपट. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher)  आणि मिथुन चक्रवर्ती   (Mithun Chakraborty)  यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट एकमेकांना टक्कर देत आहे. या दोन्हीमध्ये कोण वरचढ ठरलं  (Box Office Collection) पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

प्रभासच्या 'राधे श्याम'सोबत रिलीज झालेला 'द कश्मीर फाइल्स' 'हा चित्रपट प्रभासच्या जबरदस्त लोकप्रियतेसमोर टिकणार नाही अशी भीती होती, परंतु विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाला प्रभासचा फटका बसलेला दिसत नाहीय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊया पहिल्या दिवशी दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली आहे.

राधे श्याम बॉक्स ऑफिस कलेक्शन-

'राधे श्याम'च्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास 15 कोटींची कमाई करत जबरदस्त सुरुवात केली आहे. या चित्रपटाने केवळ हिंदी व्हर्जनच्या माध्यमातून 4.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. परंतु, बॉक्स ऑफिस इंडियाच्या म्हणण्यानुसार, जरी 'राधे श्याम'ने तेलुगूमध्ये उत्तम कमाई केली असली, तरी राज्याबाहेर मात्र तितकीशी तुफान सुरुवात केलेली नाहीय.

द काश्मीर फाईल्स बॉक्स ऑफिस कलेक्शन-

दुसरीकडे 'द कश्मीर फाइल्स'बद्दल बोलायचे झाले तर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट प्रभासच्या लोकप्रियतेसमोर तग धरू शकणार नाही, असे याआधी सांगितले जात होते. परंतु अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांचा हा चित्रपट लोकांच्या मनावर पकड बनवण्यात यशस्वी होताना दिसत आहे. कमी बजेटच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.25 कोटींची कमाई केली आहे.

First published:
top videos

    Tags: Anupam kher, Bollywood, Entertainment, Movie review, New release, Prabhas