Home /News /entertainment /

Rambo मधून टायगर श्रॉफला केलं बाहेर; आता हा अभिनेता होणार अ‍ॅक्शन हिरो

Rambo मधून टायगर श्रॉफला केलं बाहेर; आता हा अभिनेता होणार अ‍ॅक्शन हिरो

दोन वर्ष निर्माते या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. मात्र टायगर सतत कारणं देऊन शूटिंग पुढे ढकलत होता. परिणामी टायगरला या चित्रपटातून काढण्यात आलं.

    मुंबई 2 एप्रिल: बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) गेली काही वर्ष रॅम्बो (Rambo) या चित्रपटामुळं चर्चेत होता. या चित्रपटात टायगर धमाकेदार अक्शन सीन्स करताना दिसणार होता. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलं होतं. परंतु आता निर्मात्यांनी आपला निर्णय बदलला आहे. रॅम्बोमध्ये आता टायगरऐवजी बाहुबली फेम प्रभास (Prabhas) झळकणार आहे. गेले दोन वर्ष निर्माते या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. मात्र टायगर सतत कारणं देऊन शूटिंग पुढे ढकलत होता. परिणामी टायगरला या चित्रपटातून काढण्यात आलं अन् त्याजागी प्रभासची निवड करण्यात आली. बॉलिवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार टागरनं रॅम्बोच्या निर्मात्यांना न सांगताच वॉर चित्रपटासाठी तारखा दिल्या. त्यानंतर आता तो बागी 4 आणि हिरोपंती 2 या प्रोजेक्ट्सवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळं पटकथा तयार असूनही रॅम्बोचं चित्रीकरण वारंवार पुढे ढकललं जात आहे. आता जर टायगरलाच घेऊन हा चित्रपट तयार करायचा झाल्यास निर्मात्यांना आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागू शकते त्यामुळं अखेर निर्मात्यांनी अभिनेत्यालाच बदलण्याचा निर्णय घेतला. अवश्य पाहा - रस्त्यावर कपडे विकणारा कपिल शर्मा झाला सुपरस्टार; गरीब तरुणाचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास या चित्रपटात आता प्रभासला घेण्याची तयारी सुरु आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाची पटकथा प्रभासला आवडली आहे. त्यामुळं या चित्रपटासाठी तो नक्की होकार देईल अशी खात्री त्यांना आहे. शिवाय प्रभासचं फॅन फॉलोइंग टायगरपेक्षा खूप जास्त आहे. दाक्षिणात्य प्रेक्षक तर त्याची एखाद्या देवाप्रमाणे पूजा करतात. शिवाय अभिनयाच्या बाबतीतही प्रभास टायगरपेक्षा सरस आहे. या पार्श्वभूमीवर टायगरला चित्रपटातून काढणं हा योग्य निर्णय होता असं म्हटलं जात आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Marathi entertainment, Tiger Shroff

    पुढील बातम्या