मुंबई, 25फेब्रुवारी- देशभरातील लोक प्रभासच्या (Prabhas) ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही दिवसच उरले आहेत. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित राधेश्याम हा चित्रपट 11 मार्च रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलबर्नमध्ये ‘राधे श्याम’ची बुकिंग काही दिवसांपूर्वीच (Radhe Shyam Advance Booking) सुरू झाली होती. त्याठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणावर तिकिटे खरेदी केली आहेत. बाहुबली फेम प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या पेन इंडियाच्या रिलीजला अवघे काही दिवस उरले आहेत. परंतु या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच त्याच्या तिकिटांना मोठी मागणी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेलबर्नमध्ये चित्रपटाच्या अनेक शोसाठी आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. आणि अनेक चित्रपटगृहांची तिकिटे विकली गेली आहेत. बहुतांश ठिकाणी चित्रपटगृहांमधील जागा वेगाने भरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चित्रपटगृहांमध्ये जवळपास 90 टक्के तिकिटांची विक्री झाली असून, बुकिंगसाठी मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत.
या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे दिसणार असून ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरने आधीच लोकांची उत्कंठा वाढवली आहे. तसेच बाहुबलीमधील प्रभासचा अभिनय पाहून देशभरातील प्रेक्षक खूप प्रभावित झाले आहेत. त्यामुळे त्याचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. या चित्रपटाला जस्टिन प्रभाकरन यांचे संगीत असून, चित्रपटाची निर्मिती यूव्ही क्रिएशन्स आणि टी-सीरीजने केली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटासाठी 350 कोटी खर्च करण्यात आले आहेत. (हे वाचा: Gangubai Kathiawadi Movie Review: वजनदार आहे ‘गंगूबाई’, हृदयाला भिडणारे डायलॉग ) प्रेरणा आणि विक्रमादित्य यांची भव्यदिव्य प्रेमकथा ‘राधे श्याम’ चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. जगभरात हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम, चिनी आणि जपानी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रभास, पूजा हेगडे व्यतिरिक्त, भाग्यश्री, सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलीकोंडा, भाग्यश्री, जगपती बाबू, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा छेत्री, सत्यन यांसारखे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.