Home /News /entertainment /

प्रभास-पूजा हेगडेची Love Story, या दिवशी दिसणार 'राधे-श्याम'ची पहिली झलक

प्रभास-पूजा हेगडेची Love Story, या दिवशी दिसणार 'राधे-श्याम'ची पहिली झलक

या चित्रपटाची पटकथा एका प्रेमकथेवर (Love Story) आधारित असून बाहुबली फेम प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

    मुंबई, 06 फेब्रुवारी: बाहुबलीच्या यशानंतर प्रसिद्धी झोतात आलेला मेगास्टार प्रभासच्या (Prabhas) 'राधे श्याम' (Radhe Shyam) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची पटकथा एका प्रेमकथेवर (Love Story) आधारित असून बाहुबली फेम प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरनंतरच (Poster) चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर 14 फेब्रुवारीला (14 February) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राधा कृष्णा कुमार यांनी केलं आहे. 'राधे-श्याम' हा चित्रपट या प्रेमकथेवर अधारित असून विविध भारतीय भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शुटींग गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. 2020 सालच्या मे महिन्यातच या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले होती. पण देशात कोरोना विषाणूने घातलेल्या विळख्याच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे आता  Valentine's Day ला या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा वाढत चालली आहे. 'राधे-श्याम' ही युरोपमधील एक महाकाव्य प्रेमकथा असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात बाहुबली स्टार प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूरसहीत इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासचा चित्रपटात एका टेलरची भूमिका साकारत आहे, तर पूजा हेगडे राजकुमारीच्या भूमिकेत दिसू शकते. चित्रपटाच्या कथेबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी खूपच गुप्तता पाळल्याचं दिसत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबाद व्यतिरिक्त युरोपमधील अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे. याशिवाय या चित्रपटातील काही दृश्यांचं चित्रीकरण जॉर्जियात करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दाटली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड आदी भाषांत प्रदर्शित होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Prabhas, Trailer

    पुढील बातम्या