जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

भगवान राम (Lord Ram) ही देशभरातील अनेक संस्कृतींमधले सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा आहे. श्रीरामाचं पडद्यावर चित्रण करण्यासाठी अनेक चित्रपट बनवले गेले आहेत आणि भविष्यात आणखी बरेच चित्रपट बनवले जातील. सध्या ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेता प्रभास चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून खूप आशा आहेत. कारण याआधी बाहुबली फेम अभिनेता साहो किंवा राधेश्याममधून काही विशेष कमाल दाखवू शकला नाहीये. श्रीरामाच्या माध्यमातून प्रभास पहिल्यांदाच ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मात्र, आम्ही तुम्हाला त्या तेलुगू स्टार्सबद्दल सांगत आहोत, ज्यांनी प्रभासच्या आधी भगवान रामाच्या भूमिका चित्रपटात केली आहे. आपण टॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकार पाहूया ज्यांनी पडद्यावर भगवान रामाची भूमिका साकारली आहे.

01
News18 Lokmat

प्रभास रुपेरी पडद्यावरचा सर्वात महागडा श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता ठरणार आहे. त्याने हे पात्र साकारण्यासाठी 150 कोटी रुपये घेतले आहेत. प्रभास पौराणिक थीमवर आधारित त्याचा पहिला चित्रपट करत आहे, जो 'रामायण' या महाकाव्यापासून प्रेरित आहे आणि त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये बनवला जात आहे आणि भारतीय पडद्यावर बनवल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे. हा चित्रपट तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील डब केला जात आहे आणि 12 जानेवारी 2023 रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असून क्रिती सेनन जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, सैफ अली खान बहुप्रतिक्षित चित्रपटात लंकेश रावणाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. हरनाथ, सुमन आणि श्रीकांतसारखे कलाकारदेखील आहेत, ज्यांनी विविध तेलुगु चित्रपटांमध्ये भगवान रामाच्या भूमिका केल्या आहेत. परंतु, या लेखात 5 स्टार्सविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

जाहिरात
02
News18 Lokmat

'श्री राम राज्यम' हा बापू दिग्दर्शित आणि वाल्मिकीच्या रामायणावर आधारित चित्रपट 2011 मध्ये आला होता. यामध्ये नंदामुरी बालकृष्ण आणि नयनतारा राम-सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसले होते. विशेष म्हणजे दिग्दर्शक बापूंचाही हा शेवटचा चित्रपट होता. लंकेतून मायदेशी परतल्यानंतर रामाचे अयोध्येतील राज्य, सीतेपासून वेगळं होणं आणि तिची मुले लव आणि कुश यांचं संगोपन करताना तिचं जंगलातील एकांत जीवन या चित्रपटात चित्रित केलं आहे. या चित्रपटाला अनेक राज्य पुरस्कार मिळाले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

ज्युनियर एनटीआर (Jr NTR) : वाल्मिकींच्या रामायणावर आधारित ज्युनियर एनटीआरची भगवान रामाची संपूर्ण भूमिका 'बलरामायणम' मध्ये आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने इतर अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत आणि हा एक उत्कृष्ट चित्रपट मानला जातो.

जाहिरात
04
News18 Lokmat

शोबन बाबू: उप्पू शोभना चलपती राव उर्फ ​​शोबन बाबू (Shoban Babu) यांनी पडद्यावर भगवान रामाची भूमिका केली आणि प्रेक्षकांना प्रभावित केलं. या चित्रपटात चंद्रलेखाने सीतेची भूमिका साकारली होती. 'संपूर्ण रामायणम' सारख्या सुपरहिट चित्रपटात त्यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती. बापू दिग्दर्शित चित्रपट हा त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या व्यावसायिक सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता.

जाहिरात
05
News18 Lokmat

सिनीयर एनटीआर: Sr NTR हे पहिल्या पिढीतील लोकप्रिय तेलुगू अभिनेते आणि मॅटिनी आयडॉल आहेत, ज्यांना तेलुगु चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. ज्येष्ठ एनटीआर विशेषतः हिंदू देव, भगवान कृष्ण, कर्ण आणि राम यांच्या पात्रांसाठी ओळखले जातात. आपल्या चित्रपटांतून आणि पडद्यावर साकारलेली पात्रं आदर्श ठरली. NTR यांनी पडद्यावर 18 पेक्षा जास्त वेळा भगवान कृष्णाची भूमिका साकारली आहे आणि 'लव कुश', 'सीताराम कल्याणम', 'श्री रामा पट्टाभिषेकम' आणि इतर सारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांमध्ये भगवान रामाची भूमिका केली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

    प्रभास रुपेरी पडद्यावरचा सर्वात महागडा श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता ठरणार आहे. त्याने हे पात्र साकारण्यासाठी 150 कोटी रुपये घेतले आहेत. प्रभास पौराणिक थीमवर आधारित त्याचा पहिला चित्रपट करत आहे, जो 'रामायण' या महाकाव्यापासून प्रेरित आहे आणि त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये बनवला जात आहे आणि भारतीय पडद्यावर बनवल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे. हा चित्रपट तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील डब केला जात आहे आणि 12 जानेवारी 2023 रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असून क्रिती सेनन जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, सैफ अली खान बहुप्रतिक्षित चित्रपटात लंकेश रावणाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. हरनाथ, सुमन आणि श्रीकांतसारखे कलाकारदेखील आहेत, ज्यांनी विविध तेलुगु चित्रपटांमध्ये भगवान रामाच्या भूमिका केल्या आहेत. परंतु, या लेखात 5 स्टार्सविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

    'श्री राम राज्यम' हा बापू दिग्दर्शित आणि वाल्मिकीच्या रामायणावर आधारित चित्रपट 2011 मध्ये आला होता. यामध्ये नंदामुरी बालकृष्ण आणि नयनतारा राम-सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसले होते. विशेष म्हणजे दिग्दर्शक बापूंचाही हा शेवटचा चित्रपट होता. लंकेतून मायदेशी परतल्यानंतर रामाचे अयोध्येतील राज्य, सीतेपासून वेगळं होणं आणि तिची मुले लव आणि कुश यांचं संगोपन करताना तिचं जंगलातील एकांत जीवन या चित्रपटात चित्रित केलं आहे. या चित्रपटाला अनेक राज्य पुरस्कार मिळाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

    ज्युनियर एनटीआर (Jr NTR) : वाल्मिकींच्या रामायणावर आधारित ज्युनियर एनटीआरची भगवान रामाची संपूर्ण भूमिका 'बलरामायणम' मध्ये आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने इतर अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत आणि हा एक उत्कृष्ट चित्रपट मानला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

    शोबन बाबू: उप्पू शोभना चलपती राव उर्फ ​​शोबन बाबू (Shoban Babu) यांनी पडद्यावर भगवान रामाची भूमिका केली आणि प्रेक्षकांना प्रभावित केलं. या चित्रपटात चंद्रलेखाने सीतेची भूमिका साकारली होती. 'संपूर्ण रामायणम' सारख्या सुपरहिट चित्रपटात त्यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती. बापू दिग्दर्शित चित्रपट हा त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या व्यावसायिक सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता.

    MORE
    GALLERIES

  • 05 05