प्रभासनं वडिलांची इच्छा केली पूर्ण; अखेर खरेदी केली इतक्या कोटींची कार
प्रभासनं वडिलांची इच्छा केली पूर्ण; अखेर खरेदी केली इतक्या कोटींची कार
कलेक्शनमध्ये आता आणखी एका गाडीची भर पडली आहे. (expensive car video) तब्बल सहा कोटींची ही गाडी त्यानं रस्त्यांवर पळवली होती त्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
मुंबई 29 मार्च: बाहुबली (Baahubali) फेम प्रभास (Prabhas) हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानं आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या जोरावर केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच त्याला गाड्यांची देखील प्रचंड आवड आहे. (Lamborghini Aventador car) त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या अनेक गाड्या आहेत. दरम्यान या कलेक्शनमध्ये आता आणखी एका गाडीची भर पडली आहे. (expensive car video) तब्बल सहा कोटींची ही गाडी त्यानं रस्त्यांवर पळवली होती त्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
प्रभासनं अलिकडेच लॅम्बॉर्गिनी एवेनटेडर रोडस्टर ही गाडी खरेदी केली. या गाडीची किंमत भारतात तब्बल सहा कोटी रुपये इतकी आहे. या स्पोर्ट्स कारचे फोटो प्रभासच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. खरं तर ही कार प्रभासनं आपल्या वडिलांसाठी खरेदी केली होती. 2010 साली त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी त्यांना लॅम्बॉर्गिनी चालवण्याची फारच इच्छा होती. परंतु आर्थिक समस्येमुळं त्यांना ती कार खरेदी करता आली नाही. पंरंतु 10 वर्षानंतर आज प्रभास सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळं त्यानं वडिलांच्या स्मरणार्थ ही गाडी खरेदी केली.
अवश्य पाहा - पाहा देवमाणूसमधील मायराचं बॉलिवूड कनेक्शन; सलमान-वरुणसोबत केलंय काम
ही गाडी प्रभासनं अलिकडेच रस्त्यांवर देखील चालवली होती. या गाडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत लाखो चाहत्यांनी ही गाडी पाहून प्रभासवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रभास येत्या काळात आदिपुरुष या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात तो भगवान श्री राम यांची भूमिका साकारणार आहे.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.