मुंबई, 22 फेब्रुवारी : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आजघडीच्या लोकप्रिय सेलिब्रिटीजपैकी (popular celebrities) एक आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ती प्रकाशझोतात आली होती. टीव्ही इंडस्ट्रीनंतर (TV Industry) आता बॉलिवूडमध्येही (Bollywood)अंकितानं चांगलाच जम बसवला आहे. शिवाय ती सोशल मीडियावरही (social media) चांगलीच सक्रिय असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओजची खूप चर्चा होते. तिचा असाच एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.
अंकितानं नुकतंच काळ्या रंगाची बिकिनी घालून स्वमिंग पूलमध्ये एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. मात्र तिचे हे फोटो काही नेटकऱ्यांना आवडले नाहीत. परिणामी त्यांनी अंकितावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अंकिताचा आता डान्स व्हिडीओ ट्रेंड होतो आहे.
एका इंग्लिश गाण्यावर (English song) भन्नाट डान्स (dance) करताना दिसते आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram account) हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कमी वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
अंकितानं व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये (Caption) लिहिलं, 'जे लोक नियमित डान्स करतात त्यांच्यात आत्मसन्मान आणि आयुष्यात सकारात्मक विचार करण्याची क्षमता इराणहून तुलनेनं अधिक असते.' याव्हिडिओत अंकितानं काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस (black short dress) घातला आहे. कलर केलेल्या केसांची पोनीटेल बांधत समोर त्याच कपड्यांना मॅचिंग बँड बांधला आहे.
View this post on Instagram
डान्स करण्याचा तिचा अंदाज अतिशय बिनधास्त आहे. सोबतच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशय बोलके आहेत. अंकिताचा हा लूक आणि डान्स तिच्या चाहत्यांना अतिशय आवडतो आहे. अर्थात, अंकिताचा डान्स काही पहिल्यांदाच व्हायरल झालेला नाही.
काही दिवसांपूर्वी अंकितानं 'लाल इश्क' गाण्यावर केलेला डान्सही असाच चाहत्यांनी उचलून धरला होता. पण बिकिनी फोटोशूटमुळे तिने काही चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली होती.
“सुशांतच्या नावाखाली तू खूप प्रसिद्धी मिळवलीस. परंतु तरीही तुझ्याकडे काहीच काम नाही. म्हणून तू दिवसभर असे फोटो शेअर करताना दिसतेस.” अशा आशयाचे कॉमेंट्स करुन तिला ट्रोल केलं जात होतं.
View this post on Instagram
अंकिता पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर दिसली ती 'पवित्र रिश्ता' मालिकेतून. यात अंकिता आणि सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होते.
हेही वाचा - डब्बू अंकलनंतर आता साताऱ्यातील सुर्वे काकांचा धुमाकूळ;डान्स VIDEO तुफान व्हायरल
त्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मधून पदार्पण केलं. सोबतच तिनं 'बागी ३' मध्येही चांगली भूमिका साकारली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ankita lokhande, Instagram, Viral video.