मुंबई, 9 ऑक्टोबर : कायम वादग्रस्त विधानं, वादग्रस्त फोटो यामुळे चर्चेत असणारी मॉडेल सेलेब्रिटी पूनम पांडे हिच्या लग्नाची बातमी मध्ये आली होती. सॅम बॉम्बे नावाच्या पतीबरोबर ती हनिमूनला गेल्याचे फोटोही तिनेच शेअर केले होते आणि तिथून परत आल्या आल्या पतीने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पूनमने पोलिसांकडे केली होती. आता मात्र पूनम पांडेने शेअर केलेल्या ताज्या VIDEO तून तिचं पतीबरोबर सगळं आलबेल असल्याचं दिसत आहे.
मारहाणीच्या तक्रारीनंतर पूनमच्या पतीला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यानंतर तिनेच तक्रार मागे घेतली आणि आता हा VIDEO शेअर केला आहे. आता या दोघांमध्ये सगळं सुरळीत असल्याचं दिसून येत आहे. पूनम पांडेने आपल्या पतीबरोबर एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये दोघेही खूप रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे विविध गोष्टींमुळं चर्चेत असते. आपल्या पर्सनल लाइफमुळे आणि त्याबद्दल स्वतःच सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे ती खूपदा चर्चेत असते. आताचा हा व्हिडीओ शेअर करत तिने या व्हिडिओला 'मिस्टर अँड मिसेस बॉम्बे' असं कॅप्शन दिलं आहे.
या व्हिडिओत दोघेही खूप आनंदी दिसून येत आहेत. त्याचबरोबर दोघे एकमेकांशी लाडीगोडीत बोलताना दिसून येत आहेत. या व्हिडिओत तिचा पती सॅम तिला तुझे डोकं इतकं छोटे कसं ? असं विचारताना दिसतोय. त्यानंतर त्याला उत्तर देताना तुझं डोकं मोठं असल्यानं माझे डोकं छोटं असल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
लग्न झाल्यानंतर पूनम पांडे आणि तिचा पती हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. त्या ठिकाणी पतीने मारहाण केल्याचा आरोप करत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावेळी तिने घरगुती हिंसा, शारीरिक हिंसा आणि धमकी दिल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, पूनम पांडे प्रसिद्धीसाठी विविध गोष्टी करत असते. त्यामुळे हा देखील प्रसिद्धीसाठी एक स्टंट असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. तिचा पती सॅम बॉम्बे याने देखील सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Poonam pandey