मुंबई, 04 मार्च: अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey Latest News) नेहमीच वादग्रस्त विधानं आणि बोल्ड लुक्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पूनमला अनेकदा या कारणांमुळे ट्रोलिंगचा (Poonam Pandey Trolled) सामना करावा लागतो. सध्या पूनम कंगना रणौतच्या 'लॉक अप' (Kangana Ranaut's Lock Upp) या शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये तिनं वैयक्तिक आयु्ष्य आणि करिअरविषयी खुलासा केला आहे. या शोमध्ये तिने काही गोष्टी उघडपणे सांगितल्यानं तिच्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. लॉकअपच्या एका एपिसोडमध्ये तिच्या जेलमेट्स अंजली अरोरा (Anjali Arora) आणि तहसीन पूनावाला (Tehseen Poonawalla) यांनी पूनमला करिअर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनत असताना कोणत्या अडचणींचा सामना करावा असं विचारलं असता, या दोन्ही गोष्टींवर पूनमने सविस्तर भाष्य केलं.
सध्या सुरू असलेल्या लॉकअप या शोमधली वादग्रस्त स्पर्धक पूनम पांडे रोज नवे खुलासे करत असल्याने चर्चेत आली आहे. या शोमधल्या एका एपिसोडमध्ये पूनमनं तिच्या पतीविषयी (Poonam Pandey Husband) एक धक्कादायक खुलासा केला. 'माझा नवरा दारुच्या नशेत मला मारहाण करायचा. त्यामुळे ब्रेन हॅमरेजही झालं होतं', असं पूनमनं यावेळी सांगितलं.
हे वाचा-स्वप्नीलची साईशा झाल्यानंतर भावाच्या लग्नात पोहोचली होती प्रसिद्ध मराठी डिझायनर
अलीकडच्या एका एपिसोडमध्ये पूनम तिच्या जेलमेट्स म्हणजे या कार्यक्रमातील सहकारी अंजली अरोरा आणि तहसीन पूनावाला यांना अमेरिकेत शिफ्ट होण्याच्या प्लॅनिंगविषयी सांगत होती. त्यावेळी अंजलीने तिला सुरुवातीचं स्ट्रगल, करिअरमधला संघर्ष आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर बनल्यावर नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियांविषयी विचारलं असता, पूनमनं या गोष्टींवर भाष्य करत अनेक धक्कादायक खुलासे केले.
यावेळी पूनम पांडे म्हणाली की, 'समाज म्हणजे वेगळं काही नसून, तुमच्या लेनमध्ये बसून एका मुलीविषयी खूप गॉसिप करणाऱ्या पाच स्त्रिया आहेत. माझं लग्न कधी होणार आणि कधी होणार नाही, याची त्यांना नेहमी काळजी असते. मी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करेन, मी मुलाला जन्म देऊ शकेन की नाही, असे प्रश्न त्यांच्या चर्चेत असतात. मी त्यांना सांगू इच्छिते की, ही माझी जबाबदारी आहे आणि मला माझं आयुष्य कसं हाताळायचं हे माहिती आहे. मी काय वागावं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही.'
View this post on Instagram
'मी कमी कपडे घालून अंगप्रदर्शन करते म्हणून तुम्ही मला निर्लज्ज म्हणत असाल तर मी तुमच्याशी सहमत नाही. मला वाटतं की जे इतरांना लाज वाटेल असं कृत्य करतात किंवा त्यांना गलिच्छ वाटावं असं वर्तन करतात, ते निर्लज्ज असतात,' असं पूनम म्हणाली. यावर तहसीन म्हणाली की, 'लोक पूनमचे व्हिडीओ डाउनलोड करून पाहतात आणि नंतर तिच्याबद्दल वाईट बोलतात.' यावर सहमती दर्शवत पूनम म्हणाली की, '60 दशलक्ष इंप्रेशन 200 दशलक्ष एका महिन्यात होणं ही सोपी गोष्ट नाही. यात लपून फॉलो करणारे कोण आहेत. हे सर्व जण रात्रीच्या वेळी माझे व्हिडीओ पाहतात आणि सकाळी उठल्यावर माझ्यावर टीका करतात, माझ्या विरोधात कमेंट करतात. मग यात निर्लज्ज कोण मी का ते, हे मला जाणून घ्यायचं आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Poonam pandey