जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / स्वप्नीलची साईशा झाल्यानंतर भावाच्या लग्नात पोहोचली होती ही प्रसिद्ध मराठी डिझायनर; आईला बसला होता मोठा धक्का

स्वप्नीलची साईशा झाल्यानंतर भावाच्या लग्नात पोहोचली होती ही प्रसिद्ध मराठी डिझायनर; आईला बसला होता मोठा धक्का

स्वप्नीलची साईशा झाल्यानंतर भावाच्या लग्नात पोहोचली होती ही प्रसिद्ध मराठी डिझायनर; आईला बसला होता मोठा धक्का

लॉकअपमधील स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत आहेत. या स्पर्धकांपैकीच एक म्हणजे साईशा शिंदे (Saisha Shinde) होय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मार्च- नुकतंच कंगना राणौतचा   (Kangana Ranaut)  हटके रिएलिटी शो ‘लॉक अप’  (Lock Upp)  सुरू झाला आहे. या शोसोबतच त्यातील स्पर्धकही चर्चेत आले आहेत. निशा रावल, कॉमेडियन मुनावर फारुकी, पूनम पांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. लॉकअपमधील स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत आहेत. या स्पर्धकांपैकीच एक म्हणजे साईशा शिंदे   (Saisha Shinde)  होय. साईशा शिंदे या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. शोमध्ये, साईशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषत: तिच्या शस्त्रक्रियेनंतर कुटुंब आणि नातेवाईकांच्या प्रतिक्रियेबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे. खरं तर, साईशा शिंदेने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन घेतली आहे.ती आधी स्वप्नील या नावाने ओळखली जात होती. परंतु शस्त्रक्रियेद्वारे साईशाने लिंग बदलले आणि आता ती एका मुलीच्या रूपात आपलं नवीन आयुष्य जगत आहे. शस्त्रक्रियेनंतर स्वप्नीलने आपलं नाव साईशा असं केलं आहे. साईशाने सांगितले की ती शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना भेटली तेव्हा एक-दोन नव्हे तर तीन डॉक्टरांनी तिला असे न करण्याचा सल्ला दिला होता. साईशाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो एक पुरुष होता तेव्हा त्याची शरीरयष्टी खूप चांगली होती. तो खूपच देखणा होता. त्यामुळे तो मानसोपचार तज्ज्ञांकडे काऊन्सलिंगसाठी गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, स्वप्नीलने आधीच ठरवले होते. त्यामुळे त्याने कोणताही विचार न करता स्वतःचं लिंग परिवर्तन करुन घेतलं’. आज तो साईशा म्हणून जगत आहे.

जाहिरात

साईशाने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर तो आपल्या चुलत भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी घरी गेला होता. लग्नात पोहोचताच सर्वजण त्याच्याकडे आलटून पालटून बघत होते. या निर्णयात त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली. परंतु आईला हे मान्य करायला थोडा वेळ लागला. तो म्हणतो की सर्वांनी त्याचं चांगल्याप्रकारे स्वागत केलं आणि त्याच्यासोबत फोटो देखील क्लिक केले. (हे वाचा: किंसिंग सीन करायला लाजतो ‘बाहुबली’ फ्रेम प्रभास; पण या कारणामुळे देत नाही नकार ) याआधी हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ‘किताब जिंकल्यानंतर साईशा शिंदे चर्चेत आली होती. साईशानेच हरनाज संधूचा फिनाले गाऊन डिझाइन केला होता. ज्यासाठी तिचे खूप कौतुक झाले होते. साईशा सध्या कंगना राणौतच्या शो लॉकअपचा एक भाग आहे. जिथे ती इतर स्पर्धकांसह तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करताना दिसली. साईशाने सांगितले की, डॉक्टरांनी ती खूपच देखणी असल्याचे सांगून शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला दिला होता. एका डॉक्टरने त्याला सांगितले- ‘तू खूप देखणा आहेस, तुला हे सगळं करण्याची गरज नाही.‘परंतु साईशाने आपल्या मनासारखंच केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात