पणजी, 04 नोव्हेंबर : हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडे (Poonam pandey) तिच्या अश्लील व्हिडीओमुळे (vulgar video) अडचणीत सापडली आहे. गोव्यामध्ये (goa) शूट केलाला तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर तिच्याविरोधात तक्रार करण्यात आली. या व्हिडीओप्रकरणी गोव्यातील पोलीस ठाण्यात FIR देखील दाखल करण्यात आली आहे.
अभिनेत्री पूनम पांडेचा अश्लील व्हिडीओ शूट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात काणकोण पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसंच गोवा फॉरवर्ड पार्टीच्या वुमेन विंगनं पूनम पांडेविरोधात तक्रार दिली आहे, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
Goa: FIR filed against an unknown person at Canacona PS for shooting of vulgar video featuring actress Poonam Pandey. Offence registered under IPC. Also, women's wing of Goa Forward Party filed a complaint against Pandey for shooting obscene video at Chapoli Dam
— ANI (@ANI) November 4, 2020
पॉर्न प्रकारात मोडणारा व्हिडिओ गोव्यात वायरल झाला आहे. हा व्हिडीओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला असल्याने याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरलं आहे.
हे वाचा - PHOTO: जितकी बोल्ड तितकीच ट्रेडिशनल; या अभिनेत्रीचे दोन्ही लूक्स हिट
सध्याच्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते? असा आक्षेप घेत शूटिंगची परवानगी देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्याने , नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे पक्षाने केली आहे.
तसंच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. दोन महिन्यांपूर्वी पूनम पांडे आपला पती सॅम बॉम्बे याच्यासह गोव्यात हनिमूनसाठी आली असताना सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला अशी तक्रार गोव्याच्या काणकोण पोलिसात दिली होती.
हे वाचा - वयाच्या 55व्या वर्षी मिलिंद सोमणचा हॉट अंदाज, पोस्ट केला Naked फोटो
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना आता हा नवा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने सरकार समोरची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची आणि योग्य वेळी कारवाई करणार असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Poonam pandey, Video