कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये पूजा हेगडे (Pooja Hegde) पहिल्यांदाच रेड कार्पेटवर वॉक करण्यासाठी पोहोचली होती. पण तिथे पोहोचण्याआधीच तिच्यासमोर अनेक आव्हानं येऊन उभी राहिली, ज्यामुळे पूजा आणि तिची संपूर्ण टीम खूप अस्वस्थ झाली होती. नुकताच तिने याचा खुलासा केला आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये पूजा हेगडे पहिल्यांदाच रेड कार्पेटवर वॉक करण्यासाठी पोहोचली होती. पण तिथे पोहोचण्याआधीच तिच्यासोबत अनेक दुर्दैवी प्रकार घडले, ज्यामुळे पूजा आणि तिची संपूर्ण टीम खूप अस्वस्थ झाली होती. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनेच याचा खुलासा केला आहे. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram
फिल्म कंपेनियनसोबतच्या संभाषणात, पूजा हेगडेने खुलासा केला की कान्स 2022 च्या रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी तिला समजलं की, तिची एक सुटकेस हरवली आहे आणि चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे या बॅगमध्ये तिचे सर्व ड्रेस आणि मेकअपचं सामान ठेवलं होतं. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram
पूजाने सांगितलं की, ही बॅग पॅरिसमध्ये कुठेतरी राहिली होती. पण सुदैवाने, मी माझ्यासोबत काही आणखी दागिने आणले होते, जे मी भारतातून आणले होते, जे मी नंतर घातले होते. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram
अभिनेत्रीने बोलताना सांगितलं की, आम्हाला रडायलाही वेळ मिळाला नाही. पूजा म्हणाली, माझी मॅनेजर सर्वात जास्त घाबरली होती. मी म्हटलं ठीक आहे, गाडीत बसू, काही नवीन फिटिंग्ज/ड्रेस ट्राय करून पाहू. मी आउटफिट फिगरआउट करत होते आणि माझी टीम माझ्यासोबत होती. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram
पूजा हेगडे म्हणाली की, माझ्या टीमने धावपळ करून नवीन हेअर प्रोडक्ट्स, मेकअप साहित्याची व्यवस्था केली. सर्वजण वेळ पाहून काम करत होते. आम्ही दुपारचे जेवण किंवा नाश्ताही केला नाही. रात्रीच्या रेड कार्पेट वॉकनंतर दिवसभरातील पहिलं जेवण रात्री जेवलो. त्यामुळे सर्वजण खूप थकलो होतो. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram
तिची केवळ बॅगच हरवली नाही, तर पुढेही अनेक गोष्टी घडल्या, असे अभिनेत्रीनं सांगितलं. पूजा म्हणाली की, 'माझ्या हेअरस्टाइलिस्टला फूड पॉयझनिंग झालं होतं. पण तरीही तो माझी हेअऱस्टाईल करत होता. माझ्याकडे एक खूप चांगली टीम आहे आणि त्या लोकांमुळे मी आज इथे आहे. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram
पूजाने सांगितलं की, माझा मेकअप आर्टिस्ट माझ्याकडे आला आणि म्हणाला की, आम्ही सर्व तपासलं आहे, तुमच्याकडे एक बॅग होती. मी म्हणाले नाही, दोन बॅगा होत्या. परंतु, नंतर आम्हाला कळलं की भारतात कारमध्येच एक बॅग राहिली. दुसरी इथे आल्यावर… मला वाटत होतं, हे काय चाललंय माझ्यासोबत? त्यावेळी मी खूप दुःखी होते, असं अभिनेत्रीनं सांगितलं. पण मला आनंद आहे की, रेड कार्पेटवर सर्व काही व्यवस्थित पार पडलं. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram
पूजा हेगडे भारतातील 11 सदस्यीय डेलिगेशनमध्ये सहभागी होती. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. फोटो क्रेडिट-@hegdepooja/Instagram